Tanning Removal Scrub | कडक उन्हामुळे खराब झालेला चेहरा होममेड स्क्रब्स करेल स्वच्छ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tanning Removal Scrub | उन्हाळ्यात तीव्र ऊनामुळे चेहरा आणि त्वचेवर टॅनिंग (Tanning) होतं. त्याचबरोबर घामामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल बाहेर पडू लागते. त्यामुळे मुरुम आणि पुटकुळ्या येऊ लागतात. तेलकट त्वचेसाठी उत्तम घरगुती स्क्रब म्हणजे संत्र्याची साल. त्याच्या मदतीने तेलकट त्वचेला सहज स्वच्छ केले जाऊ शकते (Tanning Removal Scrub).

 

तसे पाहता, सूर्यापासून टॅनिंग टाळण्यासाठी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. अशा वेळी सनस्क्रीन त्वचेचं थराप्रमाणे संरक्षण करतं. तथापि, काही घरगुती उपचारांमुळे टॅन काढून टाकण्यास मदत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया सन टॅन कमी करणारा स्क्रब कोणता आहे (Tanning Removal Scrub).

 

ऑरेंज पील स्क्रब (Orange Peel Scrub) :
जर तेलकट त्वचा असेल तर टॅनिंगबरोबर जास्तीचे तेल काढण्यासाठी संत्र्याची सालं आणि दूध एकत्र करून स्क्रब तयार करा. यामुळे चेहरा उजळतो तसेच त्वचा तेलमुक्त होते. त्याचबरोबर दुधामुळे त्वचेला आवश्यक ओलावा निर्माण होतो. ते तयार करण्यासाठी संत्र्याची साल सुकवून पावडर तयार करावी. नंतर त्यात दूध घालून चेहर्‍यावर लावा. वाळल्यावर पाण्याने धुवावे.

लिंबू आणि साखर स्क्रब (Lemon And Sugar Scrub) :
तेलकट त्वचेसाठीही लिंबू स्क्रब उत्तम काम करतो. यासाठी थोडी साखर घेऊन त्यात लिंबाचा रस घालावा. नंतर हाताने आणि टॅनिंग एरियावर हलक्या हाताने चेहर्‍यावर चोळा. थोड्या वेळाने धुवून टाका. याचा उपयोग संपूर्ण शरीराचे टॅनिंग कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

 

मध (Honey) :
तांदळाच्या पिठापासूनही स्क्रब तयार करता येतो. यामुळे चेहर्‍यावर नैसर्गिक चमक येते.
ते तयार करण्यासाठी तांदूळ दळून त्याची पावडर तयार करावी. त्यात मध घालून पेस्ट तयार करा.
नंतर ते टॅनिंग क्षेत्रावर लावा आणि कोरडे होऊ द्या. हा स्क्रब तेलकट त्वचेवरही खूप वेगाने काम करतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Tanning Removal Scrub | tanning removal on oily skin with these home made scrub

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Drinking Cold Water Is Good Or Bad | थंड पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते का? जाणून घ्या

 

Vitamin Rich Foods | केस, नखे आणि त्वचेसाठी अप्रतिम आहेत ‘या’ 8 गोष्टी; आहारात करा समाविष्ट, जाणून घ्या

 

Weight Loss Drink | वजन कमी करण्यासाठी रोज उपाशीपोटी ‘हे’ पाणी प्या, होईल नक्की फायदा; जाणून घ्या