तनुश्रीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

तनुश्री आणि नाना पाटेकर यांच्या वादाने बॉलिवूड मधील सारे वातावरण ढवळून निघाले आहे. तनुश्री प्रकरणानंतर आता #ME TOO अंतर्गत बरीच प्रकरणे उघडकीस येत आहेत. तनुश्रीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली आहे. यामध्ये नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपल्या कारची आणि इतर साहित्याची तोडफोड आणि नुकसान केल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6affd3f3-cbb5-11e8-a298-d1ded0507ca6′]

राज्य महिला आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये तनुश्रीने २००८ मध्ये घडलेल्या संपूर्ण घटनेची सविस्‍तर माहिती दिली आहे. या तक्रारीमध्ये तनुश्रीने २००८ मध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये फेरफार व बदल करून पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. माझ्या माहितीप्रमाणे ती तक्रार मराठीमध्ये दाखल करून घेतल्याने त्यावेळी माझ्या वडिलांना विश्वासात न घेता ही तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली. वडिलांना मराठी भाषा येत नसल्याने पोलिसांकडून चुकीची तक्रार लिहिण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B075K83QJK,B01D2IBFXM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’748740d4-cbb5-11e8-8f26-af042f396126′]

नानाची पत्रकार परिषद

तनुश्री आणि नानांमधील वाद उफाळून आल्यानंतर आणि कायदेशीर बाबी समोर आल्यावर नाना पाटेकर यांनी आपल्या घरी पत्रकार परिषद बोलवली. दहा वर्षापूर्वी जे सत्य होते. तेच खरे आहे. मला जे सांगायचे आहे ते मी सांगितले आहे म्‍हणत त्यांनी पत्रकारांचे आभार मानून एक मिनिटाच्या आत पत्रकार परिषद संपवली. माझ्या वकिलांनी माध्यमांशी कोणतेही वक्‍तव्य करू नका असे सांगितल्याने मी कोणतीही भूमिका मांडणार नाही असे त्‍यांनी यावेळी स्‍पष्ट केले.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7ddee9af-cbb5-11e8-89ba-39adfc91162e’]