#MeToo प्रकरण : आता तनुश्री दत्ताच्या निशाण्यावर आमिर खान, म्हणाली …

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – #MeToo चळवळीमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्ताने आमिर खानवर निशाणा साधत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. #MeToo चळवळी अंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या कलाकारांसोबत काम न करण्याच्या निर्णयावरुन आमिरने आता यूटर्न घेतला आहे.

दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर #MeToo अभियानामध्ये गीतिका त्यागीने अनेक गंभीर आरोप केले  होते. त्यानंतर आमिरनं त्यांच्या सोबत काम न करण्याचा तसेच मोगुल चित्रपट  सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवासांपूर्वीच आमिरनं या सिनेमासाठी होकार कळवला आहे. याचे कारण देताना  अमीर म्हणाला की ‘कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत कोणतीही व्यक्ती ही निर्दोषच असते.

जोपर्यंत त्यांच्यावर कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीने घरीच बसायचे का? मी त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक महिलांशी संपर्क साधला कोणीही त्यांच्याविरुद्ध तक्रार केली नाही. माझ्या निर्णयामुळे एका व्यक्तीने आपला उदर्निर्वाहाचा हक्क गमावला आहे, हे विचार सतत माझ्या मनात यायचे. रात्रभर मला झोप यायची नाही. त्यामुळे मी सुभाष कपूर यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी IFTDA  पत्र लिहून मी सुभाष यांच्यासोबत काम करण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली.

आमिरच्या या भूमिकेवर तनुश्रीने टीका केली आहे. तसेच एखादी महिला जेव्हा अत्याचाराला बळी पडते आणि या धक्क्यामुळे चित्रपटात काम करु शकत नाही, तेव्हा बॉलिवूडमधील कोणाचीच झोप कशी उडत नाही?’ असा सवाल तनुश्रीने उपस्थित केला आहे. अमीर खान  सुभाष कपूरना काम देऊ शकतात तर ते गीतिकाला का काम देऊ शकत नाही? 2009 मध्ये हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी माझ्यासोबत घडलेल्या घटनेनंतर मी माझे घर चालवण्यासाठी काय करत आहे हे कधीही मला कोणीही विचारले नाही  असेही ती  म्हणाली.

अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने #MeToo या मोहिमेअंतर्गत केला होता.