नाना पाटेकर म्हणजे दुसरा ‘आसाराम’, तनुश्री दत्ताकडून ‘तिखट’ टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – #MeToo मोहिमेवेळी सर्वात जास्त चर्चेत राहिला तो बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचा वाद. अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि तिच्या सहकाऱ्यांबद्दल पसवरल्या जाणाऱ्या बातम्यांबद्दल माहिती देण्यासाठी तिने वकील नितीन सातपुते यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.

तनुश्री दत्ताने दाखल केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीतून नाना पाटेकर यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली होती. बी समरी अहवालात ओशिवारा पोलिसांनी स्पष्ट केले होती की नाना पाटेकर यांच्याविरोधात दाखल करण्याएवढे पुरावे नाहीत. याच बी समरी अहवालावर तनुश्रीच्या वकीलांनी आक्षेप घेतला.

तर तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या वकीलांवर देखील पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला. नाना पाटेकर यांनी मनसेच्या गुंडांना सिनेमाच्या सेटवर बोलावून गोंधळ घातला आणि नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यने माझं करिअर उद्धवस्त केलं असा आरोप तनुश्रीकडून करण्यात आला. याबाबत आता तनुश्रीला न्यायालयाने पुढील तारीख दिली आहे.

नाना पाटेकर दुसरा आसाराम –
नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू आहे, अशा शब्दात अभिनेत्री तनुश्री दत्नाने नाना पाटेकर यांच्यावर टीका केली. तसेच नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला. नाम फाऊंडेशनच्या नावाखाली परदेशातून देवाणघेवाणीचे काम सुरु असल्याचे तनुश्री म्हणाली. तनुश्री म्हणाली की परदेशातून आलेला सर्व पैसा जातो कुठे, गरिबांना वर्षातून एकदा साडी वाटून फोटो काढला की त्याचं काम झालं. कोल्हापूरात 500 घरं बांधून देण्याचे काम कुठवर आलं हे कोण पाहायला गेलंय असा सवाल देखील तनुश्री दत्ताने विचारला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/