राखी सावंत गोत्यात; तनुश्रीने ठोकला दहा कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – अभिनेत्री तनुश्री दत्ताने ‘मी टू’ मोहीमेअंतर्गत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला. त्यानंतर  ‘मी टू’चे  वादळ अख्या  बॉलिवूडमध्ये घुमू लागले. तनुश्रीच्या नाना पाटेकरांवरील आरोपानंतर बॉलिवूड मधील काही कलाकारांनी तनुश्रीला तर काही कलाकारांनी नाना पाटेकर यांना पाठिंबा दिला. या प्रकरणात राखी सावंत नाना पाटेकर यांना पाठिंबा दिला. एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना राखी सावंतने “तनुश्री ड्रग्ज घेऊन तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये पडली होती. नाना पाटेकर आणि गणेश आचार्य यांच्या सांगण्यावरुन मला तिचं गाणं करावं लागलं होतं.” अशी माहिती दिली होती. आता वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे राखी चांगलीच गोत्यात आली आहे. कारण आता तनुश्रीने तिच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. त्याचबरोबर राखीकडे तब्बल दहा कोटींची मागणी केली आहे.
काय म्हणाली होती राखी सावंत –
तनुश्री ड्रग्ज घेऊन तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये पडली होती. नाना पाटेकर आणि गणेश आचार्य यांच्या सांगण्यावरुन मला तिचं गाणं करावं लागलं होतं. असे राखी म्हणाली होती.
तनुश्रीवर भाष्य करतानाचा राखी सावंतची एक मुलाखत व्हायरल झाली होती. राखी म्हणाली होती की, “तनुने सिनेमातील गाणं अर्धवट सोडलं होतं. यानंतर कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचा मला कॉल आला. तू सेटवर ये, गाण करायचं आहे, एवढंच गणेशने सांगितलं. मग मी तातडीने सेटवर पोहोचले.” या घटनेबद्दल सांगताना राखीने अनेकदा तनुश्रीसाठी अपशब्दांचा वापर केला होता.
 CINTAA ने  पाठवलेल्या नोटिशीला नानांचं सविस्तर उत्तर
काही दिवसांपूर्वी तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर  ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ म्हणजेच ‘सिंटा’ने नाना पाटेकरांना नोटीस पाठवली होती. या नोटीशीला नानांनी आपल्यावरील आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे अाहेत असे सांगितले आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकरांनी आपल्यासोबत गैरवर्तन केलं होतं असा तनश्रीचा नानांवर आरोप आहे.

‘माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत. तनुश्री दत्तावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे’ असं उत्तर नाना पाटेकरांनी सिंटाकडे दिलं आहे. तनुश्रीने केलेल्या आरोपांची दखल घेत सिंटाने नाना पाटेकर यांना नोटीस पाठवून विचारणा केली होती, त्यानुसार आज नाना पाटेकरांनी आपल्यावरील सर्व आरोपांचं खंडन केलं आहे.

जाहिरात
दरम्यान, यापूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने ओशिवरा पोलिसांकडे नाना पाटेकर यांची नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी केली आहे. तनुश्रीने आपल्या वकिलांमार्फत या चाचण्या करण्यासाठी ओशिवरा पोलिसांकडे अर्ज केला आहे. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यासह गणेश आचार्य, सामी सिद्दीकी आणि राकेश सारंग यांची सुद्धा नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी केली आहे. तनुश्रीने १० ऑक्टोबरला ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये या चौघांविरोधात रीतसर तक्रार दाखल केली.
तनुश्रीने नानांवर आरोप करत म्हटले होते की, ‘२००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केले होते आणि मनसेकडून धमकावले होते. या सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. कोरियोग्राफरला दूर सारत डान्स स्टेप्स कशा कराव्यात दाखवण्याचा अट्टाहास नाना करत होते.’ इतकेच नाही तर  कॉन्ट्रॅक्टनुसार ते गाणं सोलो होतं मात्र नाना पाटेकरांना आपल्यासोबत इंटिमेट सीन करायचा होता असा गंभीर आरोपही तिने केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे ते गाणं न करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले होते.