तक्रार देण्यासाठी तनुश्री बुरखा घालून पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

अभिनेत्री तनुश्री दत्ता अभिनेता नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलीये. पोलीस स्टेशनमध्ये ही बुरखा घालून पोहोचलीये. तिची तक्रार दाखल करून घेण्याची प्रकिया सुरू आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’61597215-cca2-11e8-aaba-bf66ac0b01d9′]

तनुश्रीसोबत तिचे वकील नितीन सातपुते सोबत आहे. दोन दिवसांपूर्वी तनुश्री दत्ताने महिला आयोगाकडे धाव घेतली होती. तनुश्रीने महिला आयोगाकडे लेखी तक्रार केलीये. नाना पाटेकर आणि गणेश आचार्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केलीये.
महिला आयोगाने मंगळवारी तनुश्रीच्या तक्रारीची दखल घेतली होती.. महिला आयोगाने अभिनेता नाना पाटेकर, गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना नोटीस बजावत १० दिवसांत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहे. तसंच तनुश्रीलाही या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोगासमोर स्वतः उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

तनुश्रीविरोधातही अदखलपात्र गुन्हा दाखल.

[amazon_link asins=’B075R798X9,B075NSR9HF,B075R85W3J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’839ea2be-cca2-11e8-a606-e360bda8e898′]

तनुश्री दत्ताच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली. बीड येथील मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी तनुश्रीविरोधात पोलिसांत धाव घेतली. केज पोलीस स्टेशनमध्ये तनुश्रीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. तनुश्रीने आरोप करून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेची बदनामी केल्याने अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचंही धस यांनी सांगितलं.

टेम्पो-ट्रकची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू

दरम्यान, नाना पाटेकरांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी तनुश्री दत्ताला कायदेशीर नोटीस पाठवलीय. या नोटिसीत तनुश्रीनं नानावर केलेले आरोप खोटे आहेत आणि तिनं नानांची क्षमा मागावी असं म्हटलंय.