‘या’ अभिनेत्रीला साकारायची आहे सुषमा स्वराज यांची भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लोधी रोड येथील स्मशानभूमीत अंत्यंसस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात आले. राजकिय क्षेत्रासह इतर क्षेत्रातील लोकांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

अभिनेत्री तापसी पन्नूनेही स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यासोबतच तापसीने एक इच्छा व्यक्त केली आहे. संधी मिळाल्यास सुषमा स्वराज यांच्यावरील चरित्रपटामध्ये (बायोपिक) प्रमुख भूमिका साकारायला मला आवडेल असे मत तापसीने व्यक्त केले आहे. एका मुलाखतीतत तापसीने ही इच्छा व्यक्त केली.

तापसीने साऊथ चित्रपटापासून बॉलिवुडमध्ये काम करून मोठ्या प्रमाणावर आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. तापसीने स्वराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना आपण त्यांची मोठी चाहती असल्याचे सांगितले. संधी मिळाल्यास मला सुषमाजींच्या आयुष्यावर आधारित सिनेमा करायला नक्कीच आवडेल. एवढ्या महान आणि उत्तम व्यक्तीमत्वावर आधारित बायोपिकमध्ये काम करायला कोणालाही आवडेलच. मला यामध्ये नक्कीच प्रमुख भूमिका साकारायला आवडेल. त्या एक उत्तम व्यक्ती आणि राजकारणी होत्या. त्यांच्या आयुष्यावरील सिनेमात काम करायची संधी मिळाली तर मी ती सोडणार नाही, असं त्यांनी म्हटलं.

तसंच त्या आपल्यात नाहीत यावर माझा विश्वास बसत नाही. लहानपणापासून टीव्हीवर मी त्यांची भाषणे ऐकली आहेत. अनेकदा त्यांची भाषणे सुरु असताना मी हातातली कामे टाकून ती पाहिली आहेत. त्या माझ्या आवडत्या राजकारणी होत्या. मी त्यांची मोठी चाहती होती आणि कायमच राहीन, असं तापसीने सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त