…म्हणून अभिनेत्री तापसी पन्नूने चाहत्याच्या कानाखाली ‘गणपती’ काढला

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या अदांमुळे आणि सोशलमिडियात सक्रिय राहिल्याने नेहमीच चर्चेत असते. आता या कुल दिसणाऱ्या या अभिनेत्रीच्या रुद्रावताराचे देखील दर्शन घडले. तापसी पन्नूने जबरदस्तीने सेल्फी घेणाऱ्या एका चाहत्याचे थोबाड रंगवले.

‘मनमर्जिया’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तापसी आणि तिची बहिण जेवणासाठी एकत्र एका हॉटेलमध्ये गेली होती. फुटपाथवर ड्रायव्हरची गाडी घेऊन येण्यासाठी वाट पाहत असताना एका तिच्या चाहत्याने बाईक उभी करून परवानगी न घेता सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. त्या चाहत्याच्या या अशा वागण्यामुळे पन्नू चांगलीच भडकली. तिने रागाच्या भरात त्या चाहत्याला थोबाडीत लगावली. पन्नूने त्या चाहत्याचा मोबाईल हिसकावून घेत काढलेला सेल्फी डिलीट केल्याचेही सांगितले. गेम ओव्हर चित्रपटाच्या संबंधित मुलाखत देत असताना पन्नूने हा प्रसंग सांगितला. तिने रागात त्या चाहत्याला सांगितले की, ’फोन जेब में रखो, नहीं तो तोड़ दूंगी!’

अशा वागण्याचे कारण देखील पन्नूने सांगितले आहे. तिने सांगितले की, चित्रपटातील एखाद्या भूमिकेतुन ती ९० % पूर्णपणे बाहेर येते मात्र १० % त्या भूमिकेचा अंश स्वभावात उतरतो. पन्नू म्हणाली की, मी त्या वेळेस मनमर्जीया चित्रपटातील भूमिकेतून बाहेर पडू शकले नव्हते. त्यामुळे मी अशाप्रकारे वागले. असा खुलासा तापसी पन्नूने केला आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

You might also like