फ्लाईटमध्ये प्रवाशांसमोर हात जोडताना ‘या’ अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री तारा सुतारीया लवकरच अभिनेता टायगर श्रॉफ आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे सोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तारा आणि अनन्या या चांगल्या मैत्रीणी आहेत. सध्या ताराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत तिच्या सोबत अनन्या देखील दिसत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे की, प्रवाशांनी भरलेल्या विमानात तारा बसलेली दिसत आहे. शिवाय सर्वांसमोर ती हाथ जोडताना दिसत आहे. खरंतर दोघीही एका फ्लाईटमध्ये बसलेल्या आहेत. यावेळी बाहेरचं वातावरण खूपच खराब होतं. या खराब वातावरणामुळे तारा सुतारीया खूपच घाबरली आणि यानंतर दोन्ही हात जोडून प्रार्थना करू लागली.

दुसरीकडे तारा सुतारीयाच्या बाजू्च्या सीटवर अनन्या पांडे बसलेली दिसत आहे. तिने जेव्हा ताराला पाहिलं तेव्हा तिला वाटलं की तारा गंमतच करत आहे. परंतु काही वेळानंतर मात्र अनन्यालाही खात्री पटली की, खराब वातावरणामुळे तारा घाबरलेली आहे. तारा सुतारीया आणि अनन्या पांडेचा हा व्हिडीओ धर्मा प्रॉडक्शनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या दोन्हीही अभिनेत्रींच्या चाहत्यांना त्यांचा हा व्हिडीओ खूपच आवडल्याचे दिसत आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना तारा सुतारीयाने कंगना रणौत तिची रोल मॉडेल असल्याचे सांगितले होते. तिने असेही सांगितले होते की, ती कंगनाची खूप मोठी फॅन आहे.

मुलाखतीत पुढे बोलताना तारा सुतारीयाने सांगितले की, ती कंगनाचा खूप आदर करते. तारा म्हणाली की, “आऊट साइडर असल्याने मी कंगना रणौतला रोल मॉडेल मानते. कंगनाने आपल्या टॅलेंटच्या जीवावर, कोणचाही कसलाही सपोर्ट न घेता सर्व काही मिळवले आहे. आउटसाईडर्ससाठी ती रोल मॉडेल आहे.

You might also like