Tara Sutaria | आदरशी खरंच ब्रेकअप झालं का? या प्रश्नावर तारा सुतारियाने दिली प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन : Tara Sutaria | अभिनेत्री तारा सुतारिया आणि आदर जैन यांचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे. त्यांनी परस्पर सहमतीने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला आहे. ताराने ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होते. तर आदर जैन हा बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या आत्याचा मुलगा आहे. तारा सुतारिया आणि आदर जैन हे मागच्या 4 वर्षांपासून एकत्र होते मात्र आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे. अद्याप या ब्रेकअप प्रकरणी दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही आहे. (Tara Sutaria)

Advt.

तारा व आदरच्या ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियावर सुरु असताना तारा 4 जानेवारी रोजी एअरपोर्टवर स्पॉट झाली. ताराने शॉर्ट ब्लॅक ड्रेस आणि ब्राऊन लेदर जॅकेट परिधान केलं होतं. तिला एअरपोर्टवर पाहताच पापराझींनी गर्दी केली. यावेळी तारानेदेखील पोज दिली. त्यावेळी तिचे फोटो आणि व्हिडीओ काढताना उपस्थित असलेल्या पत्रकारांनी ताराला ब्रेकअप बद्दल प्रश्न विचारला. ‘तुमच्या ब्रेकअपबद्दल बातम्या येत आहेत, त्या खऱ्या आहेत का?’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. (Tara Sutaria)

2018 मध्ये तारा आणि आदर यांची ओळख एका मित्राच्या माध्यमातून झाली होती.
यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली. दोघे सोबत वेळ घालवू लागले.
4 वर्षे रिलेशन मध्ये राहिल्यानंतर ते आता वेगळे झाले आहेत.
आदरने 2017 मध्ये ‘कैदी बँड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
तर तारा सुतारीया लवकरच ‘अपूर्व’ चित्रपटात दिसणार आहे.

Web Title :-Tara Sutaria | tara sutaria reaction when paparazzi asked about breakup with aadar jain see video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा मध्य प्रदेशातील चंदनाच्या कारखान्यांवर छापा; 15 लाखांचे चंदनाचे तेल व लाकुड हस्तगत, राज्यात प्रथमच चंदन तस्करीच्या मुळापर्यंत पोहचले पोलीस

Former MLA Mohan Joshi | पुण्याच्या सांस्कृतिक कोपर्‍यावर प्रकाश जावडेकरांनी का हातोडा मारला? – मोहन जोशी