दलित समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीवर FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दलित समाजाबद्दल केलेले वक्तव्य तारक मेहता(Tarak Mehta) का उल्टा चश्मा मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला चांगलेच महागात पडले आहे. अंबोली पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियम (अॅट्रोसिटी अॅक्ट) २०१५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनमुन दत्ता असे तिचे नाव असून तारक मेहता(Tarak Mehta) का उल्टा चश्मा मध्ये तिने बबितची भूमिका साकारली आहे.
१० मे रोजी मुनमुन दत्ता हिने मेकअपबद्दल एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये तिने ‘क्योंकि मैं यूट्यूब में आने वाली हूं और मैं अच्छा दिखना चाहती हूं, ‘….’ की तरह नहीं दिखना चाहती.’ असं सांगत असताना तिने वाल्मिकी समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त करत दलित समाजाने तिच्यावर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी अंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, आता गुन्हा दाखल झाला आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील वीरपत्नी नितिका विभूती धौंडियाल बनल्या ‘लेफ्टनंट’
दरम्यान, आपली चूक लक्षात आल्यानंतर एक पोस्ट शेअर करत मुनमुनने माफी मागितली होती. मी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये माझ्याकडून एक शब्द वापरला गेला त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. कोणाच्याही भावना दुखवण्याचा किंवा कोणाला धमकी देण्याचा उद्देश नाही. संकुचित भाषाज्ञानामुळे मला त्या शब्दाचा अर्थ नेमका माहीत नव्हता. त्याचा मला नेमका अर्थ समजल्यावर मी लगेच तो भाग काढून टाकला.
अॅलर्जीपासून सांधेदुखीपर्यंत, जास्त टोमॅटो खाल्ल्याने होतात ‘या’ 8 प्रकारचे नुकसान
Velchi Tea : उन्हाळ्यात सोडू नका चहा, रोज प्या एक कप वेलची चहा, होतील ‘हे’ 4 जबरदस्त फायदे