‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील नट्टू काकांची प्रकृती बिघडली

पोलिसनामा ऑनलाईन – तारक मेहतामधील नट्टू काकांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नट्टू काका हे पात्र करणार्‍या घनश्याम नायक यांना घशाचा त्रास होऊ लागला. रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या घशाची एक शस्रक्रिया केली जाणार आहे.

घनश्याम गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता सिरीयलमध्ये दिसत नव्हते. लॉकडाऊननंतर शूट झालेल्या एपिसोडमध्ये नट्टू काका दिसले नसल्यामुळे चाहत्यांनाही प्रश्न पडला होता. सोशल मीडियावरही होणार्‍या उलट-सुलट चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. घनश्याम यांच्या घशात गाठ तयार होत असल्याचे काही रिपोर्टमधून समोर आले. त्यामुळे त्यांना खूप जास्त त्रास होऊ लागला. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नट्टू काका लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा तारक मेहतामध्ये परतावेत यासाठी चाहत्यांसह सिरीयलमधील टीमही प्रार्थना करत आहे.