‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील अंजली भाभी थिरकली ‘हुसन है सुहाना’ या गाण्यावर

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये अंजली भाभीची भूमिका साकारणा-या नेहा मेहताने मालिकेला सोडल्यानंतर तिच्या जागी काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सुनैना फौजदारची एंट्री झाली. सुनैना सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. नुकताच तिने कुली नंबर वनमधील ‘हुसन है सुहाना’ या गाण्यावर शानदार डान्स केला असून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो चाहत्यांना आवडला आहे. ‘1990 च्या दशकातील असण्याचा मला अभिमान आहे.

या गाण्यांमुळे मला नृत्य आणि अभिनय करण्याची प्रेरणा मिळाली. असे कॅप्शन सुनैनाने तिच्या डान्स व्हिडिओला दिले आहे. सुनैना फौजदारने संतान मालिकेतून छोट्या पडद्यावरील कारकीर्दीला सुरूवात केली होती. यानंतर राईट लेफ्ट राईट, मित मिलादे रब्बा, हमसे है लाईफ, यम है हम, बेलनवाली बहू अशा मालिकांमध्ये ती झळकली.

सुनैनाचे इंस्टाग्रामवर जवळपास २ लाख ३३ हजार फॉलोव्हर्स आहेत. आज ख्रिसमसच्या दिवशी वरुण धवन आणि सारा अली खानचा ‘कुली नंबर 1’ सिनेमा रिलीज झाला आहे, जो गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या 1995 च्या कुली नंबर 1 चित्रपटाचा रीमेक आहे.