Tarak Mehta Ka Ulta Chashmah | ‘तारक मेहता’ फेम नट्टू काका यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘तारक मेहता का उल्टा चेश्मा’ (Tarak Mehta Ka Ulta Chashmah) या मालिकेतील सर्वांचे लाकडे नट्टू काका (Nattu Kaka) अर्थात अभिनेते घनश्याम नायक (Actor Ghanshyam Nayak) यांचं आज (रविवार) निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. निर्माते असित कुमार मोदी (Producer Asit Kumar Modi) यांनी घनश्याम नायक यांचं निधन झाल्याचे सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून घनश्याम नायक यांची कर्करोगाशी (Cancer) झुंज सुरु होती, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली (passes away). कोरोनाच्या काळात करण्यात आलेल्या लॉकडामुळे ते तारक मेहता का उल्टा चेश्मा (Tarak Mehta Ka Ulta Chashmah) च्या शूटिंग वर देखील आले नव्हते. काही महिन्यापूर्वीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

मागील 50 हून अधिक वर्षापासून घनश्याम नायक प्रेक्षकांचे मनोरंजन (Entertainment) करत होते. त्यांनी खरी ओळख आणि प्रसिद्धी तारक मेहता का उल्टा चेश्मा या मालिकेनं दिली. या मालिकेतून ते घराघरात पोहोचले होते. नट्टू काका या पात्राला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. नट्टू काका हे मालिकेत पहिल्यापासून जोडलेले होते. त्यांची एक विनोदी शैली, त्यांचे संवाद प्रेक्षकांना आवडायचे. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींना त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

त्यांची शेवटची इच्छा अपूर्ण राहिली

काही दिवसांपूर्वी त्यांनी एका मुलाखतीत आपली शेवटची इच्छा बोलून दाखवली होती.
मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे.
माझी ही इच्छा देवाने पूर्ण करावी, असं ते भाऊक होऊन म्हणाले होते.

Web Title :- Tarak Mehta Ka Ulta Chashmah | tarak mehta ka ulta chashma actor nattu kaka aka ghanshyam nayak dies at 77

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cold Water Bathing | रोज गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर व्हा सावध! संशोधनातून समोर आली ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 151 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Auto Debit Transaction | जर ऑटो-डेबिटने भरत असाल वीज, पाणी आणि LPG चे बिल तर RBI चा ‘हा’ नियम परिणाम करू शकतो, जाणून घ्या कसा