‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ला मिळाली नवीन ‘दया बेन’

पोलीसनामा ऑनलाइन टीम : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या कार्यक्रमात गेले अनेक दिवसा पासून दया बेन गायब आहे. प्रेक्षक त्यांच्या येण्याची प्रतिक्षा करत आहेत. तर अशाच या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता त्यांना आजून वाट पहायची गरज नाही. कारण सूत्रांच्या अनुसरे असे सांगण्यात येत आहे की मेकर्सना नवीन दया बेन भेटली आहे.

या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींचे नाव समोर आले होते. आता अशा एका अभिनेत्रींचे नाव समोर आले आहे जी दया बेन ची भूमिका साकारणार आहे. हि अभिनेत्री अनेक टीव्ही कार्यक्रमात दिसली होती. तर ही अभिनेत्री कोणी नसून विभूती शर्मा आहे. विभूती शर्मा ‘बड़े अच्छे लगते हैं’ आणि ‘हमने ली है शपथ’ या टीव्ही कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता आधीची दया बेन दिशा वकानी यांची कार्यक्रमात परत येण्याची शक्यता संपली आहे.पण मेकर्स कडून तरी नव्या दया बेन ची कोणतीच घोषणा झालेली नाही. 

प्रसार माध्यमातून अशी चर्चा चालू होती की कित्येक दिवसा पासून दया बेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन चालू होते. पण अभिनेत्रीचे नाव ठरले नव्हते. अलीकडेच सूत्रांच्या अनुसरे सांगण्यात आले आहे की, दया बेन या भूमिकेमध्ये विभूति शर्मा दिसणार आहे. या भूमिकेसाठी विभूतिचा मॉक शूटही घेण्यात आला. ज्यात ती दिशा वकानी सारखीच दिसत होती. अजून पर्यंत तरी विभूतिने कॉन्ट्रैक्ट साइन नाही केला आहे.

दिशा गर्भवती असल्याने २०११७ रोजी मैटरनिटी लीववरून कार्यक्रमाच्या बाहेर गेली होती. पण अलीकडेच असे सांगितले जात आहे की आता दिशाला मैटरनिटी लीव नंतर कार्यक्रमात पुन्हा येण्याची इच्छा नाही. कार्यक्रमात परत येण्यासाठी दिशाने काही नियम आणि अटी कांट्रैक्ट मध्ये जोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण कार्यक्रमाचे निर्माता असित मोदी यांनी यासाठी नकार दिला. तेव्हा पासूनच निर्माता दया बेनच्या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते.