टॅरो टिप्स 12 नोव्हेंबर 2020 : तूळ राशीवाल्यांना मिळेल मदत, वृषभ राशीवाल्यांचे वाद मिटतील

मेष- Page of wands
धनलाभ होऊ शकतो. नवे लोक आणि मित्रांशी भेट होऊ शकते. टेन्शन दूर होईल. एखादा गैरसमज दूर होईल. दिवसाची सुरुवात चांगली होईल.
उपाय : विष्णू सहस्रनामाचा जप करा.

वृषभ- Reverse of lovers
बिझनेसमध्ये फायदा होईल. जुने वाद मिटतील. नोकरीत पदोन्नतीचे योग. कुटुंब आणि संततीकडून सन्मान मिळेल.
उपाय : भगवन विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करा.

मिथुन- Two of cups
आज गरजेचपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. विचार केलेली कामे होतील. कमी बोलाल आणि महत्त्वाच्या कामाबद्दल संकुचित राहाल.
उपाय : मखाना खीर भगवान विष्णूंना अर्पण करा.

कर्क- kNight of swords
इच्छा आणि प्रयत्न सुरू राहतील. अनेक गोष्टी नियंत्रणात राहतील. पार्टनरकडून प्रेम आणि सहकार्यसुद्धा मिळू शकते. इन्कम चांगले राहील. या राशीच्या काही विद्यार्थ्यांना तणाव जाणवेल.
उपाय : मखाना मिश्रीचा प्रसाद श्री कृष्णाला अपर्ण करा.

सिंह- The Heirophant
सोबत काम करणारी एखादी व्यक्ती मदत करू शकते. ऑफिस किंवा तुमच्या जवळपासच्या विरुद्ध लिंगी व्यक्तीचे सहकार्य मिळेल. अंगदुखी किंवा डोळ्यांशी संबंधित काही त्रास होऊ शकतो.
उपाय : दुधाचे दान गरजूला करा.

कन्या- King of cups
कार्यक्षेत्र आणि बिझनेसशी संबंधित प्रवास होतील. काही खास लोकांशी मीटिंगसुद्धा होऊ शकते. जबाबदारी मिळेल आणि पूर्णसुद्धा होईल. स्वतःवर विश्वास ठेवा.
उपाय : बुक्स डोनेट करा.

तूळ- Eight of swords
एखाद्या खास कामासाठी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न राहील. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आपल्याला फायदा होऊ शकतो. वडिलांकडून मदत मिळू शकते. आज धावपळ जास्त होऊ शकते.
उपाय : विष्णू चालीसाचे पठन करा.

वृश्चिक- The sun
योजना अयशस्वीसुद्धा होऊ शकतात. याबाबत सावधान राहावे लागेल की, तोंडातून केवळ संतुलित शब्द निघतील किंवा तुमच्या बोलण्यावरून विनाकारण वाद होऊ नये. नवीन संपर्क होतील.
उपाय : तुळशीत दिवा लावा.

धनू- Queen of pentacles
नियम आणि संयम ठेवा. कामातून लक्ष हटले तर तुमच्या समोर अनेक समस्या येऊ शकतात. फायद्याच्या चांगल्या संधी मिळतील.
उपाय : पहिली पोळी गाईसाठी काढा किंवा गोशाळेत दान करा.

मकर- Six of wands
मेहनत आणि जबाबदारी वाढेल. विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे योग आहेत. जुनी कामे मार्गी लावण्यासाठी चांगली वेळ आहे. जे काही करायचे आहे, ते आपल्याच बळावर करायचे आहे.
उपाय : भगवान विष्णूंना पाच गोड फळे अर्पण करा.

कुंभ- Three of cups
व्यापार्‍यांना मेहनतीमध्येसुद्धा जास्त लाभ होण्याचे योग आहेत. बेरोजगार लोकांना रोजगार मिळू शकतो. तुम्ही अशा कामापासून दूर राहा ज्याबद्दल तुम्हाला अंदाज नाही.
उपाय : एखाद्या मंदिरात जव, तीळ आणि तांदळाचे दान द्या.

मीन- The moon
संकोच असल्याने काही कामे अर्धवट राहू शकतात. तोबडतोब कोणताही फायदा मिळणार नाही. टेन्शन राहील. गाडी चालवताना सावधान.
उपाय : गाईला आपल्या हाताने मिश्र धान्य खाऊ घाला.