Tarri Movie | ‘टर्री’ चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज; ललित प्रभाकर व गौरी नलावडे दिसले रोमॅंटिक अंदाजात

0
335
Tarri Movie | lalit prabhakar new marathi movie tarri romantic song kshan halwa release
file photo

पोलीसनामा ऑनलाईन : Tarri Movie | ललित प्रभाकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ललित चित्रपटांमध्ये येण्याच्या अगोदर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या तो त्याचा नवीन चित्रपट ‘टर्री’ (Tarri Movie) याच्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ‘टर्री’ चित्रपटात ललित प्रभाकरसह मराठमोळी अभिनेत्री गौरी नलावडे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

या चित्रपटातील ‘क्षण हळवा’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात ललित व गौरीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. लिपलॉक, किसिंगसह अनेक रोमँटिक सीन्सची झलक या गाण्यातून पाहायला मिळत आहे. ललित व गौरीचा रोमान्स असलेलं हे गाणं ‘O.Y.S. Originals’ या युट्यूब चॅनेलवरुन प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘क्षण हळवा’ हे गाणं गुरू ठाकूर यांनी लिहिलं आहे. तर रोहित राऊत व शरयू दाते यांनी हे गाणं गायले आहे. ‘क्षण हळवा’ हे ‘टर्री’ चित्रपटातील दुसरं गाणं आहे. याआधी ललितचं चित्रपटातील ‘लाव फोटो माझा’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. या गाण्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. ‘टर्री’ (Tarri Movie) या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश काळे यांनी केलं आहे. हा चित्रपट 17 फ्रेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
या चित्रपटामध्ये एक अनोखी लव्हस्टोरी पाहायला मिळणार हे मात्र नक्की…

ललितच्या वर्कफ्रंट बोलायचे झाल्यास तो टी.टी. एम.एम, चि. आणि चि. सौ. का, हंपी, सनी, झोंबिवली,
आनंदी गोपाळ, पेट पुराण या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर गौरी नलावडे फ्रेंड्स, कान्हा,
गोदावरी आणि फॅमिली कट्टा या चित्रपांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता ह्या नव्या कोऱ्या जोडीची
लव्ह स्टोरी प्रेक्षकांना किती भावते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :- Tarri Movie | lalit prabhakar new marathi movie tarri romantic song kshan halwa release

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tara Sutaria | तारा सुतारियाच्या लूकने वाढले सोशल मीडियाचे तापमान

Rashmika Mandanna | एअरपोर्टवर स्पॉट झाली रश्मिका मंदाना

Shivani Dandekar | ‘या’ कारणामुळे शिवानी दांडेकर झाली ट्रोल, पाहा फोटो!