‘टारझन’ स्टार जो लारा याचा विमान अपघातात मृत्यु; मृतांमध्ये पत्नीसह 7 जणांचा समावेश

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – १९९६ मध्ये आलेल्या टारझन : द एपिक अ‍ॅडव्हेंचर या अफाट गाजलेल्या चित्रपटाचा नायक टारझन जो लारा ( Joe Lara) (वय ५८) याचा एक विमान अपघातात मृत्यु झाला. या विमान अपघातात जो लारा याच्या बरोबरच त्याची पत्नी लेखिका आणि डायट गुरु ग्वेन लारा यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. त्यांच्या मागे तीन मुले आहेत.

स्थानिक वेळेनुसार शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सेनेना सी ५०१ या छोट्या जेट खासगी विमानाने स्मिर्ना विमानतळावरुन उड्डाण घेतले. ते फ्लॉरिडामधील पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले होते. विकएंडसाठी जो लारा जात होता. उड्डाणानंतर टेर्नीजवळील पर्सी प्रिस्ट लेकमध्ये हे विमान कोसळले. या अपघाताचे वृत्त समजताच अग्निशामन दलाच्या पथकाने संपूर्ण रात्रभर विशेष ऑपरेशन राबविले. मात्र, अपघातात कोणीही बचावले नाही.

२ ऑक्टोंबर १९६२ रोजी सॅन डिएगो, कॉलिफोर्निया येथे जन्मलेल्या लारा याने १९८९ मध्ये सीबीएस टेलिव्हिजनच्या टारझन इन मॅनहॅटन आणि त्याच्या २२ भागांमध्ये त्याने काम केले होते. मात्र, टारझन : द एपिक अ‍ॅडव्हेंचर या चित्रपटातील टारझनच्या भूमिकेने तो जगभर गाजला होता. टारझनच्या भूमिकेला मिळालेल्या अफाट प्रसिद्धीमुळे जो लाराकडे अनेक अ‍ॅक्शिन फिल्म चालत आल्या. अमेरिकन सायबॅर्ग : स्टील वॉरियर, स्टील फ्रंटियर, वॉरहेड, आर्मस्ट्रांग, डुम्सडेयर या चित्रपटात त्याने भूमिका केल्या. २०००च्या दशकाच्या सुरुवातीला त्याने संगीत अल्बममध्ये अभियन केला. जो लारा : द क्रॉस ऑफ फ्रीडम हा अल्बमही प्रसिद्ध केला होता.

Also Read This : 

31 मे राशीफळ : आज ‘या’ 6 राशींचे ग्रह प्रबळ, मिळणार मोठे यश, इतरांसाठी असा आहे महिन्याचा शेवटचा दिवस

पुण्यात साधे पेट्रोलही शंभरी ‘पार’ !

19 वर्षाच्या मुलीने आपल्याच घरात बॉयफ्रेंडसोबत केली 16 लाखांची चोरी, कारण ऐकून आई-वडील आणि पोलिसांना बसला धक्का