तस्लीमा नसरीन यांचा आरोप, बांगलादेशातील धार्मिक स्थळांवर दररोज होताहेत बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपले लिखाण आणि धर्मावर कटाक्ष तसेच विवादास्पद टिप्पण्यांमुळे परिचित असलेल्या लेखिका तस्लीमा नसरीन यांनी बांगलादेशातील धर्मस्थळांमध्ये दररोज बलात्कार होण्याचा आरोप केला आहे.

तस्लीमा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा मुद्दा उपस्थित केला.
तस्लीमा यांनी लिहिले की, ” बांगलादेशातील मशिदी-मदरशामध्ये दररोज बलात्कार होत आहे. अल्लाहच्या नावाखाली बलात्कार होत आहे. मदरसेचे बलात्कारी-शिक्षक, बलात्कारी-मशिदी इमामांचा असा विश्वास आहे की, जर त्यांनी पाच वेळा प्रार्थना केली तर ते त्यांच्या पापांपासून मुक्त होतील, कारण अल्लाह क्षमा करत आहे. ”

तस्लीमा नसरीन या नेहमीच धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या ढोंगीपणाबद्दल आवाज उठवतात. बर्‍याच कट्टरपंथीयांनी त्यांच्याविरोधात सूचना जारी केली आणि त्यांना जिवे मारण्याची धमकीदेखील देण्यात आली आहे. यामुळेच त्यांना आपला देश बांगलादेश सोडावा लागला आणि आता त्या भारतात निर्वासित जीवन जगत आहेत.