Tata Airbus Project | काँग्रेसचा घणाघाती आरोप, शिंदे फडणवीस सरकार गुजरातचे एजंट! प्रकल्पांपाठोपाठ मुंबई सुद्धा त्यांना देऊन टाकतील

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर (Vedanta-Foxconn Project) आता नागपुरात होणारा टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus Project) सुद्धा गुजरातला गेल्याने राज्यात संतप्त पडसाद उमटत आहेत. यावरून सर्वच विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) धारेवर धरले आहेत. आता काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले की, शिंदे-फडणवीस सरकार गुजरातचे एजंट असून ते उद्योग, प्रकल्पांपाठोपाठ मुंबई सुद्धा त्यांना देऊन टाकतील.

नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने मोदी सरकार (Modi Government) गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे. राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबई ही गुजरातला देऊन टाकतील. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत हे स्पष्ट झाले आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले की, महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहेत. गुजरात महाराष्ट्राच्या मागे आहे याचे शल्य पंतप्रधान मोदींना आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे.

पटोले म्हणाले, दुर्देवाने यापूर्वीचे फडणवीस आणि आताचे ईडी या दोन्ही सरकारांनी महाराष्ट्राचे हित डावलून मोदींच्या गुजरातच्या हिताला जास्त महत्व दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, पालघर येथील प्रस्वातील मरीन अकादमी, मुंबईतील डायमंड बोर्स असे अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेले.

पटोले पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) कार्यकाळात
गुजरातला प्रकल्प जाणे थांबले होते. त्यामुळेच मोदी शाह यांनी ईडीचा वापर करून राज्यातील महाविकास आघाडी
सरकार पाडून गुजरातच्या तालावर नाचणार्‍या कळसुत्री बाहुल्यांचे सरकार आणले आहे.
या सरकारच्या काळात वेदांता फॉक्सकॉनचा 2 लाख कोटी रूपयांचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला.
बल्क ड्रग पार्क प्रकल्पही (Bulk Drug Park Project) राज्याबाहेर गेला.
त्यानंतर आता टाटा एअरबसचा 22 हजार कोटी रूपयांचा प्रकल्पही गुजरातला गेला.

ते म्हणाले, राज्यात सरकार बदलल्यापासून तीन महिन्यात तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत.
काही दिवसांपूर्वी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्यात येणार म्हणून जाहीरपणे सांगणारे राज्याचे उद्योगमंत्री
आता निर्लज्जपणे हा प्रकल्प मागील सरकारमुळे राज्याबाहेर गेला असे सांगत आहेत.
उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत की गुजरातचे? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे.

Web Title :- Tata Airbus Project | congress nana patole slams shinde and fadnavis govt over tata airbag project went to gujarat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena | महाराष्ट्रातील राजकीय कटुता मान्य करणार्‍या फडणवीसांना शिवसेनेचे आवाहन, कटुता संपवाच, लागा कामाला

Zero Interest Loan | मराठा तरुणांना व्यावसायासाठी बीनव्याजी मिळणार कर्ज