Tata Elxsi Share | टाटा ग्रुपच्या ‘या’ स्टाॅकने केली गुंतवणूकदारांची चांदी; 1 लाखावर 4 कोटींचा जबरदस्त परतावा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Elxsi Share | अनेकजण सुरक्षित गुंतवणूक (Secure investment) आणि चांगला परतावा (Good Return) मिळण्यासाठी चांगले स्टाॅक शोधत असतात. कमीत कमी वेळात श्रीमंत व्हावं. त्यासाठी नागरीक स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावतात. हा एक मोठा व्यवसाय बनला आहे. अनेकांच्या नजरा चांगल्या शेअर्सकडे लागल्या असतात. टाटा ग्रुपचा (Tata Group) शेअर (Tata Elxsi Share) देखील अधिक फायदेशीर आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना अधिक मालामाल देखील केले आहे.

 

टाटा एलेक्सी (Tata Elxsi Share) असं टाटा ग्रुपच्या या शेअरचं नाव आहे. मागील काही वर्षातील ट्रेंड पाहिला तर कंपनीचे शेअर्सने भरपूर परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना तब्बल 50 हजार टक्क्यांपर्यंत नफा मिळवून दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा याकडे लक्ष देत असतात. (Tata Elxsi Share)

 

दरम्यान, गेल्या काही वर्षामध्ये टाटा एलेक्सीचा शेअर 17.55 रुपयांचा होता तसेच, जून 2022 मध्ये हा शेअर 8600 रुपयांच्या पुढे पोहचला आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2001 साली कंपनीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते.
तर त्यांना आज जवळपास चार कोटी रुपये मिळाले असते. त्यामुळे हा शेअर लोकांच्या फायदेशीर आहे.
आणि या शेअर्सने गुंतवणूकदारांना अधिक मालामाल देखील केले आहे.

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Tata Elxsi Share | tata group share given investors billions returns in year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा