Tata Group Best Stock | टाटा समूहातील ‘हा’ सर्वोत्तम स्टॉक; गुंतवणूकदारांचं बनलाय आकर्षण; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Tata Group Best Stock | अनेक गुंतवणूकदार शेअरकडे लक्ष केंद्रित करत असतो. कोणता स्टाॅक अधिक फायद्याचा आहे. याकडे सर्व किरकोळ गुंतवणुकदारांच्या (Investors) नजरा लागलेल्या असतात. दरम्यान काही दिवसांवर 2022 चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) येवून ठेपला आहे. रिअल इस्टेट आणि इंफ्रास्ट्रक्चर बाजाराला याच सेक्टरमधून पाठींबा मिळतो. रिअल इस्टेट सेक्टरमध्ये (Real Estate Sector) या काळात उत्तम मागणी पाहायला मिळत आहे. खरंतर या सेक्टरला बूस्ट देण्यासाठी सरकार योजनाही आणू शकते. असे म्हटले जातेय. परंतु, गुंतवणूकदारांना चांगला लाभ मिळवण्यासाठी टाटा समूहातील सर्वोत्तम स्टॉक (Tata Group Best Stock) हेमिस्फेअर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेड (Hemisphere Properties India Ltd) हा शेअर आहे.

 

सध्या रिअल इस्टेट सेक्टरमध्ये बूम आहे. बजेटमध्ये देखील त्याबाबत काही घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे बाजारात मजबूत फंडामेंटल असलेला रिअल इस्टेट शेअर म्हणून हेमिस्फेअर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेडकडे बघितले जातेय. तर, ही कंपनी टाटा ग्रुपचा (TATA Group) एक भाग आहे. या कंपनीमध्ये टाटा ग्रुपची 22.5 टक्के भागिदारी आहे. हा शेअर आगामी काळामध्ये 200 ते 250 रुपयांपर्यंत उच्च पातळी घेण्याची शक्यता आहे. (Tata Group Best Stock)

दरम्यान, हेमिस्फेअर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेड (Hemisphere Properties India Ltd) रिअल इस्टेट कंपनी 2005 मध्ये इन कॉर्पोरेट झाली होती.
कंपनीकडे मोठ्या प्रमाणात लॅंड बँक आहे.
टाटा कम्युनिकेशन पासून कंपनीला 740 एकरची जमीन हस्तांतरण झाली आहे.
यामधील 540 एकर जमीन एकट्या पुण्यात आहे.
जेथे रेसिडेशिअल रिअल इस्टेटमध्ये मोठी प्रगती दिसू शकते.
तर, आगामी काळामध्ये लॅंड डेव्हलपमेंटचे कंपनीचे नियोजन आहे.
यासाठी कंपनी टाटा हाऊसिंग आणि टाटा कंस्ट्रक्शनसोबत मिळून काम करू शकणार आहे.
म्हणून, या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Tata Group Best Stock | tata group best stock before budget 2022 hemisphere properties india may give high return as government focus on real estate

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा