TATA – रिलायन्समध्ये मोठी स्पर्धा, अब्जावधी डॉलर मोजून टाटा मोठा धमाका करण्याच्या तयारीत

पोलीसनामा ऑनलाइन – चीनची मोठी कंपनी अलिबागचे पाठबळ असलेली बिग बास्केट कोरोना काळात प्रकाशझोतात आली आहे. कोरोना काळात लोक घरातून बाहेर पडत नाहीत. त्यामुळे दैनंदिन भाजीपाला, वस्तू या लोकांपर्यंत पोचविण्याचे काम बिग बास्केट करत आहे. तसेच लोकही या वस्तू ऑनलाईन खरेदी करताहेत. मिंटने या व्यवहाराची माहिती दिली.

देशातील सर्वात मोठा ग्रुप असलेल्या टाटा आता चीनच्या अलीबाबाची कंपनी बिग बास्केट विकत घेणार आहे. जवळपास १.६ अब्ज डॉलर मोजून टाटा या कंपनीत ८० टक्के समभाग विकत घेणार आहे. याबाबतचा निर्णय अद्याप अंतिम फेरीत आहे.टाटा ग्रुप बिग बास्केट मध्ये २० टक्के हिस्सेदारी आणि त्याच्या संचालक मंडळावर दोन सीट मागण्याची शक्यता होती. मात्र, नंतरच्या डीलमध्ये टाटा आता८०% मालकी घेणार आहे. दरम्यान, टाटाच्या प्रवक्त्याने यावर बोलण्यास नकार दिला असून बिग बास्केट कडूनही यावर काही उत्तर आलेलं नाही.

दरम्यान, बिग बास्केट नवीन गुंतवणूकदार शोधत होती. यामध्ये सिंगापूर सरकारची टेमासेक, अमेरिकेची जनरेशन पार्टनर्स, फिडेलिटी आणि टायबर्न कॅपिटल कॅपिटल यासारख्या कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. कंपनी या व्यवहारातून ३५ ते४० कोटी डॉलर करण्याच्या विचारात होती. यामुळे कंपनीचे व्हॅल्युएशन ३३ टक्के वाढून दोन अब्ज डॉलरवर जाऊ शकते.

टाटामध्येही होणार गुंतवणूक

टाटा समुहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर बहुराष्ट्रीय कंपनी वॉलमार्ट कडून २५अब्ज डॉलर सुमारे एक पॉईंट ८५ लाख कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सध्या चर्चा सुरू आहे. मिंटने दिलेल्या वृत्तानुसार वॉलमार्ट आणि टाटा समूहांमध्ये या संभाव्य कराराबाबत चर्चा सुरू आहे. यापूर्वी वॉलमार्टने २०१८ मध्ये फ्लिपकार्टमध्ये सुमारे १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक करत ६६ टक्के भागीदारीची खरेदी केली होती. आता टाटा समूहसोबतचा करार हा फ्लिपकार्ड पेक्षाही मोठा असण्याची शक्यता आहे. या करारासाठी वॉलमार्टकडून वीस ते पंचवीस हजार अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येण्याची शक्यता आहे. जर हा करार पूर्णत्वास गेला तर टाटा समूह आणि वॉलमार्ट संयुक्त प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे.