Tata Group Companies Share | टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीमुळे गुंतवणूकदार झाले मालामाल; 17 रुपयांचा शेअर 8600 रुपयांवर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Tata Group Companies Share | अनेक मोठे गुंतवणूकदार (Investors) लाँग टर्ममध्ये ट्रेड करतात आणि चांगला नफा देखील कमावतात. त्यासाठी अनेकजण सुरक्षित गुंतवणूक (Secure investment) आणि चांगला परतावा (Good Return) मिळवण्यासाठी अधिक लक्ष देत असतात. या दरम्यान, बाजारात असे अनेक शेअर्स आले आहेत. मात्र गुंतवणूकदार जिथे चांगला परतावा मिळेल त्याकडे अधिक लक्ष देत असतात. अशातच टाटा समूहाच्या एका कंपनीने (Tata Group Companies Share) गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.

 

Tata Elxsi ही टाटा समूहाची कंपनी आहे. Tata Elxsi च्या शेअर्सनी मागील काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना जवळपास 50 हजार टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 17 रुपयांवरून 8600 रुपयांपर्यंत वाढले आहेत. Elxsi च्या शेअर्सनी यंदा आतापर्यंत गुंतवणूकदारांना 47 टक्क्यांहून जादा परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 9,420 रुपये आहे.

21 सप्टेंबर 2001 रोजी Tata Elxsi चे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE) वर 17.55 रुपयांच्या पातळीवर होते. 6 जून 2022 रोजी कंपनीचे शेअर्स National Stock Exchange-NSE वर 8,680 रुपयांवर बंद झाले आहेत. Tata Elxsi च्या शेअर्सनी या कालावधीत गुंतवणूकदारांना साधारण 50 हजार टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 21 सप्टेंबर 2001 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 4.95 कोटी रुपयांच्या जवळपास पोहचले असते.

 

5 वर्षात 1 हजार टक्क्यांहून परतावा –

मागील पाच वर्षामध्ये गुंतवणूकदारांना 1,027 टक्के परतावा दिला आहे. 9 जून 2017 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर Tata Elxsi चे शेअर्स 770 रुपयांच्या पातळीवर होते. 6 जून 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 8,680 रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या व्यक्तीने 9 जून 2017 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर सध्याची रक्कम आकरा लाख रुपयांपेक्षा (Eleven Lakh Rupees) अधिक झाली असती.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा