Tata Group Companies | टाटा ग्रुपच्या ‘या’ अनोळखी कंपन्यांनी केली कमाल, पैसा लावणारे झाले मालामाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Group Companies | ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मला वाटते की टाटांच्या घरावर देवाचा आशीर्वाद आहे. झुनझुनवाला यांनाही टाटा ग्रुप खूप आवडतो. टाटा ग्रुपच्या काही कंपन्यांनी (Tata Group Companies) गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.

 

टाटा ग्रुपच्या काही कंपन्या अशाही आहेत, ज्यांनी गेल्या 2 वर्षात जबरदस्त रिटर्न दिला आहे, परंतु त्यांच्याबद्दल अनेकांना माहिती नाही. टाटा ग्रुपच्या या अनोळखी कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांत 3,500 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे.

 

ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग अँड असेंबलीने दिला 3,550% रिटर्न
टाटा ग्रुपच्या या शेयरने गेल्या 2 वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. टाटाग्रुपची कंपनी कार आणि व्यावसायिक वाहनांसाठी शीट-मेटल स्टॅम्पिंग, वेल्डेड असेंबली आणि मॉड्यूल तयार करते. 27 मार्च 2020 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 12.60 रुपयांच्या पातळीवर होते.

 

9 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स इडए वर 447.40 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेयरनी दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 3,550 टक्के रिटर्न दिला आहे.

1 लाख रूपये झाले 35 लाखांपेक्षा जास्त
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 27 मार्च 2020 रोजी कंपनीच्या शेयर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या ती रक्कम 35.50 लाख रुपयांच्या जवळपास गेली असती. टाटा ग्रुपच्या या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 923.85 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 31 रुपये आहे.

 

टाटा ग्रुपची प्रमोटेड Tata Autocomp Systems या कंपनीत 75 टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित 25 टक्के हिस्सा जनतेकडे आहे. टाटा मोटर्स व्यतिरिक्त, कंपनी जनरल मोटर्स इंडिया, फियाट इंडिया, पियाजिओ व्हेईकल्स, अशोक लेलँड, जेसीबी आणि एमजी मोटर्स सारख्या कंपन्यांना आपली उत्पादने विकते.

 

नेल्कोने 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 580 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे.
नेल्को (Nelco) ही टाटा ग्रुपची IT नेटवर्किंग इक्विपमेंट कंपनी आहे. 27 मार्च 2020 रोजी कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 129.80 रुपयांच्या पातळीवर होते. 9 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स NSE वर 756.80 रुपयांवर बंद झाले.

 

कंपनीच्या शेयरनी 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 580 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. टाटा ग्रुपची ही कंपनी संरक्षण, रेल्वे, स्टील, सिमेंट, ऑटोमोबाईल, ऑईल आणि गॅस, पेपर यासारख्या काही कोअर कंपन्यांना सेवा पुरवते. (Tata Group Companies)

नेल्कोमध्ये 1 लाख रुपये झाले 5.83 लाख रुपये
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 27 मार्च 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती,
तर आता ती रक्कम 5.83 लाख रुपयांच्या जवळपास झाली असती. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 971.95 रुपये आहे.

 

त्याच वेळी, 52 आठवड्यांसाठी लो लेव्हल 179 रुपये आहे.
टाटा ग्रुपची पॉवर युटिलिटी फर्म टाटा पॉवर (Tata Power) ही या कंपनीतील सर्वात मोठी भागधारक आहे.
नेल्कोमध्ये टाटा पॉवरची 48.64 टक्के भागीदारी आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Tata Group Companies | tata group 2 hidden companies delivered huge return

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Damage Notes Exchange | ‘फ्री’मध्ये बदलता येणार फाटलेल्या नोटा; संपुर्ण पैसे परत मिळणार?, जाणून घ्या सविस्तर

 

Maha Vikas Aghadi | बीडनंतर ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेनेने दिला थेट ‘पालकमंत्री हटाव’ चा नारा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6248 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी