Tata Group | टाटा ग्रुपच्या ‘या’ दोन कंपन्यांकडून राकेश झुनझुनवाला यांनी 10 मिनिटात कमावले 186 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Group | भारतीय शेअर बाजाराचे (Stock Market) बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांची शेयर बाजारात काही मिनिटांत 186 कोटींची कमाई झाल्याची चर्चा आहे. टाटा समूहाच्या (Tata Group) टाटा मोटर्स आणि टायटन (Tata Motors and Titan) च्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे ही कमाई झाली आहे. 15 फेब्रुवारी 2022 रोजी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांच्या आत टायटनच्या शेअरमध्ये 37 रुपयांची वाढ झाली. तर टाटा मोटर्सचा शेअर बाजार उघडताच 4.80 रुपयांनी वाढला. (Share Market Marathi News)

 

टायटनने (Titan) स्टॉक एक्स्चेंज (Stock Exchange) ला दिलेल्या माहितीनुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांच्याकडे टायटनचे 4,52,50,970 शेअर्स किंवा डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस कंपनीमध्ये 5.09 टक्के हिस्सा होता.

 

टायटनमधील तेजीचा मिळाला फायदा :
टायटन हा देशातील सर्वात मोठा ज्वेलरी ब्रँड आहे. डिसेंबर तिमाहीच्या आकडेवारीनुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 3.57 कोटी शेअर्स आणि त्यांच्या पत्नीकडे 95.40 लाख शेअर्स आहेत. तर 15 फेब्रुवारी 2022 रोजी टायटनमध्ये 37 रुपयांच्या वाढीनुसार राकेश झुनझुनवाला यांनी 167.24 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

टाटा मोटर्समध्येही मोठा हिस्सा :
शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्समध्ये 1.18 टक्के हिस्सा किंवा 3.93 कोटी शेअर्स आहेत. त्याच्या स्टेकमध्ये अद्याप कोणताही बदल झालेला नाही असे गृहीत धरून, त्यांनी 4.80 रुपयांच्या वाढीच्या आधारे 18.86 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. (Tata Group)

 

राकेश झुनझुनवाला यांचा दोन्ही शेअर्समधील नफा एकत्र केला, तर त्यांना सुमारे 186 कोटी (167.24 कोटी + 18.86 कोटी) नफा झाला आहे.

 

राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ (Rakesh Jhunjhunwala’s Portfolio) :
बिझनेस न्यूज वेबसाइट मनी कंट्रोलवर दिलेल्या माहितीनुसार, बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये लहान
आणि मोठ्या कंपन्यांसह एकूण 37 कंपन्या आहेत आणि त्यांचा एकूण पोर्टफोलिओ 33,728 कोटी रुपये आहे.

 

डिसेंबर 2021 च्या तिमाही डेटानुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील टॉप 5 कंपन्या एस्कॉर्टस लिमिटेड,
टायटन कंपनी लिमिटेड, टाटा मोटर्स लिमिटेड, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड, क्रिसिल लिमिटेड
(Escorts Limited, Titan Company Limited, Tata Motors Limited, Indian Hotels Company Limited, CRISIL Limited) आहेत.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Tata Group | rakesh jhunjhunwala earned rs 186 crore in 10 minutes from titan and tata motors

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंधाला पोटचा 13 वर्षाचा मुलगा ठरत होता अडथळा, परकरच्या नाडीने आईने आवळला गळा

 

Pune Crime | पुण्यात पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन आत्महत्या करुन अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याची धमकी

 

Dark Knees & Elbows Remedies | ‘या’ 5 सोप्या घरगुती उपायांनी दूर करा गुडघे आणि कोपरांवरील काळेपणा; जाणून घ्या