TATA Group च्या ‘या’ 2 शेयरमधून राकेश झुनझुनवाला यांनी एका महिन्यात कमावले 893 कोटी रुपये, तुमच्याकडे आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  TATA Group | सर्व सेक्टरमध्ये रॅलीदरम्यान बिगबुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये सहभागी शेयरने (Rakesh Jhunjhunwala portfolio stocks) यावर्षी सप्टेंबरमध्ये मोठी ग्रोथ केली आहे. टाटा मोटर्स (TATA Group) आणि टायटन (Titan) कंपनी त्यांच्यापैकी एक आहेत. मागील एक महिन्यात टाटा मोटर्सच्या शेयरची किंमत (stock price) सुमारे 13 टक्के वाढली.

टायटन कंपनीचे शेयर (Titan stock price) या कालावधीत 11.40 टक्के वाढले, या दोन शेयरमधील तेजीमुळे राकेश झुनझुनवाला (Rakesh jhunjhunwala networth) यांची एकुण संपत्ती या महिन्यात जवळपास 893 कोटीने वाढली आहे.

Tata Motors मध्ये राकेश झुनझुनवाला यांची भागीदारी

एप्रिलपासून जून 2021 तिमाहीसाठी टाटा मोटर्सच्या शेयरधारण पॅटर्ननुसार, बिगबुलकडे 3,77,50,000 शेयर आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये, टाटा मोटर्सच्या शेयर प्राईस
(tata motors share price) हिस्ट्रीनुसार, NSE वर हा ऑटो स्टॉक (Auto stock) 287.30 रूपयांवरून वाढून 331 प्रति इक्विटी शेयर झाला आहे.
प्रति शेयर 43.70 ची निव्वळ वाढ दिसून आली.
या दरम्यान झुनझुनवाला यांनी सप्टेंबर 2021 मध्ये टाटा मोटर्सच्या शेयर होल्डिंगद्वारे 164.9675 कोटी कमावले.

Titan कंपनीत राकेश झुनझुनवाला यांची शेयर भागीदारी

एप्रिलपासून जून 2021 तिमाहीसाठी टायटन कंपनीच्या शेयरधारण पॅटर्ननुसार, बिगबुल (Big bull) आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी टाटा समूहाच्या (Tata Group) या कंपनीत गुंतवणूक केली आहे.
टायटन कंपनीत राकेश झुनझुनवाला यांचे होल्डिंग 3,30,10,395 शेयर आहे तर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 96,40,575 शेयर आहेत.

राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीद्वारे एकुण मिळून टायटनचे शेयर 4,26,50,970 आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये टायटनचा शेयर 1921.60 रूपये प्रति शेयरवरून वाढून 2092.50 रूपयाच्या स्तरावर पोहचला. या कालावधीत 170.90 रूपयांची वाढ झाली आहे. यामुळे राकेश झुनझुनवाला यांनी या शेयरमधून 728.90 कोटी रूपये कमावले आहेत.

 

राकेश झुनझुनवाला यांच्या एकुण संपत्तीमध्ये वाढ

टाटा समूहाच्या या दोन शेयरमध्ये राकेश झुनझुनवाला यांची एकुण संपत्ती सप्टेंबर 2021 मध्ये 8938725773 रूपये किंवा 893.87 कोटी रूपये (रू. 728.90 + 164.97 रू.) वाढली आहे.

झुनझुनवाला यांनी आपल्या आणि पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या नावावर गुंतवणूक केली आहे.
ते एक चार्टर्ड अकाऊंटंट आहेत आणि असेट फर्म रेयर एंटरप्रायजेसचे व्यवस्थापन करतात.
ट्रेंडलाईननुसार, राकेश झुनझुनवाला अँड असोसिएट्सकडे सार्वजनिक प्रकारे 38 स्टॉक आहेत ज्यांची एकुण संपत्ती 21,897 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे.


डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : TATA Group | rakesh jhunjhunwala earns rs 893 crore from tata group share in september check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | आता बिगर सरकारी लोकांना सुद्धा मिळू शकते मोदी सरकारकडून पेन्शन, करावे लागेल या अटींचे पालन

Pune Corporation | समान पाणी मिळणार असेल तर मीटर कशाला? काँग्रेस गटनेते आबा बागुल यांचा सवाल

Jayant Patil | ‘धनंजय मुंडेंना पुढच्या 10 निवडणुका कोणी हरवू शकत नाही’ – जयंत पाटील