Tata Group | रतन टाटा यांच्या टायटनची बाजारात ‘धूम’, TCS नंतर ‘हा’ टप्पा गाठणारी बनली दुसरी कंपनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Group | टाटा ग्रुपच्या प्रीमियम कंपन्यांपैकी एक टायटन (Titan) लिमिटेडच्या शेयर (Share) मध्ये आज 10 टक्केची तेजी दिसून येत आहे. ज्याचा परिणाम बाजारावर सुद्धा स्पष्ट दिसत आहे. या तेजीनंतर टायटन टाटा ग्रुपची दुसरी अशी कंपनी बनली आहे, जिचे मार्केट कॅप (market cap) 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. आतापर्यंत टाटा ग्रुप (Tata Group) ची टीसीएसच (TCS) अशी कंपनी होती जिचे मार्केट कॅप 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे होते.

तर दुसरीकडे टायटनच्या गुंतवणुकदारां (investors) ची सुद्धा चांदी झाली आहे. ज्यांच्याकडे टायटनचे एक हजार शेयर असतील, त्यांना प्रति शेयर 200 रुपयांच्या तेजीच्या हिशेबाने दोन लाख रुपयांपेक्षा जास्त फायदा होईल. मागील 10 वर्षात कंपनीने गुंतवणुकदारांना 1000 टक्केने जास्त रिटर्न दिला आहे.

टाटा ग्रुपची (Tata Group) दुसरी सर्वात मोठी कंपनी
आज टायटनचे मार्केट कॅप 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्यानंतर ग्रुपची दुसरी मोठी कंपनी बनली आहे.
सध्या कंपनीचे मार्केट कॅप 208807.30 कोटी रुपयांवर पोहचले आहे. जे टीसीएसनंतर सर्वात जास्त आहे.

टाटा कन्संल्टन्सी सर्व्हिस (Tata Consultancy Services) चे मार्केट कॅप 14 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
ही रिलायन्स इंडस्ट्रिज (Reliance Industries) नंतर देश आणि बाजारातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

आज कंपनीच्या शेयरमध्ये 10 टक्केची तेजी
आज टायटन कंपनीच्या शेयरमध्ये 10 टक्केची तेजी पहायला मिळत आहे. आज व्यवहाराच्या सत्रात कंपनीचा शेयर 2361.45 रुपयांसह ऑल टाइम हाय वर पोहचला आहे.
तर आज कंपनीचा शेयर 2222.85 रुपयांवर ओपन झाला होता.
सध्या कंपनीचा शेयर 9.64 टक्के म्हणजे 207 रुपयांसह 2353.80 रुपयांवर व्यवहार करत आहे.

मागील 10 वर्षात 1000 टक्के रिटर्न
टायटन कंपनीच्या गुंतवणुकदारांना सुद्धा मोठा लाभ झाला आहे.
आजच्या बाबत बोलायचे तर ज्याच्याकडे 1000 शेयर आहेत, त्याला सुमारे 2 लाख रुपयांचा फायदा झाला आहे.
मागील 10 वर्षाबाबत बोलायचे तर कंपनीचा शेयर 7 ऑक्टोबर 2011 ला सुमारे 208 रुपयांवर होता, जो आज 2300 रुपयांच्या वर पोहचला आहे.
या दरम्यान कंपनीच्या शेयरमध्ये 1000 टक्केपेक्षा जास्त गुंतवणूक पहायला मिळाली आहे.

Web Title :- Tata Group | ratan tatas titan made a splash in the market became the second company after tcs to achieve this position

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाची ‘छापेमारी’; उपमुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?

Reliance Retail | रिलायन्स रिटेल भारतात ‘7-इलेवन स्टोअर्स’ चालवणार

Pune Crime | महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळवून नेणार्‍या चोरट्याला नागरिकांनी पकडले