Tata Group Share | टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअरवर तज्ञांनी व्यक्त केली 25 टक्के रिटर्नची अपेक्षा, आता गुंतवणुकीतून होऊ शकतो मोठा नफा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Group Share | टाटा समूहाच्या शेअर्सकडे मजबूत स्टॉक म्हणून पाहिले जाते. हे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अनुकूल मानले जातात. तुम्ही टाटा समूहाच्या कोणत्याही शेअर्समध्ये (Tata Group Share) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टाटा केमिकल्स लिमिटेड (Tata Chemicals Limited) चे शेअर्स तपासू शकता. पुढील काही दिवसांत बरीच गती येण्याची आशा विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. (Share Market Marathi News)

 

ET मधील एका रिपोर्टनुसार, अनुभवी आर्थिक आणि गुंतवणूक सल्लागार आनंद राठी या स्टॉकवर बुलीश दिसत आहेत आणि त्यांनी यास 1,170 रुपयांच्या टार्गेट प्राईससह खरेदीचा सल्ला दिला आहे. सध्या कंपनीचा शेअर एनएसईवर 934.25 रुपये आहे, म्हणजेच तुम्ही आता यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला सुमारे 25 टक्के नफा मिळू शकतो. (Tata Group Share)

 

काय आहे तज्ञांचे मत
आनंद राठी यांनी त्यांच्या नोटमध्ये लिहिले आहे की, आम्हाला विश्वास आहे की कंपनी पुढील दोन वर्षांत 13% CAGR (कंपाऊंड अ‍ॅन्युअल ग्रोथ रेट) वर आपला महसूल वाढवेल.
त्याचवेळी, आम्हाला विश्वास आहे की कंपनी खर्चात कपात,
उत्पादन कार्यक्षमता वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय कर्ज कमी करण्यावर लक्ष केंद्रित करून आपले प्रॉफिट मार्जिन कायम ठेवेल. (Stock Market Marathi News)

कंपनी आर्थिक वर्ष 22 मध्ये तिच्या उत्पन्नाच्या 19.6 पट आणि आर्थिक वर्ष 23 मधील उत्पन्नाच्या 17.4 पटीने व्यवसाय करत आहे.
आम्ही टाटा केमिकल्सवर रू. 1,170 प्रति शेअर टार्गेट प्राईससह बाय रेटिंग देत आमचे कव्हरेज सुरू करत आहोत.
टाटा केमिकल्सचे शेअर्स गेल्या 5 दिवसांत 1.08 टक्क्यांनी घसरले आहेत.

मात्र गेल्या 1 महिन्यात त्यात 3.25 टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे.
त्याचवेळी, गेल्या सहा महिन्यांत या शेअरमध्ये 7.38 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तसेच, 2022 मध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये वर्षानुसार 5.76 टक्के वाढ झाली आहे.

कंपनीचा व्यवसाय
टाटा केमिकल्स लिमिटेड ही 24,660 कोटी रुपयांच्या मिड-कॅपची कंपनी आहे.
ही कंपनी आशियातील सर्वात मोठी सॉल्टवर्क्ससह जगातील तिसरी सर्वात मोठी सोडा अ‍ॅश आणि सहाव्या क्रमांकाची सोडियम बायकार्बोनेट उत्पादक आहे.

तिचे 2 विभाग आहेत, बेसिक केमिस्ट्री आणि स्पेशलिटी केमिस्ट्री. काच, डिटर्जंट, फार्मास्युटिकल, बिस्किट मेकिंग,
बेकरी आणि इतर क्षेत्रातील अनेक प्रमुख उत्पादक हे टाटा केमिकल्सच्या बेसिक केमिस्ट्री उत्पादनांवर अवलंबून आहेत.

 

Web Title :- Tata Group Share | money making tips analyst expressed expectation of 25 percent return on this share of tata group now there can be strong profit on investment

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा