Tata Group Stock | टाटाच्या ‘या’ कंपनीने एका वर्षात गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 1 लाखाचे झाले 18 लाख, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tata Group Stock | अनेक गुंतवणूकदार आपल्या चांगल्या कमाईसाठी चांगल्याच शेअरकडे बघत असतात. अनेकांच्या नजरा तर जादा परताव्याकडे लागल्या असतात. तर, ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबलीजने (Automotive Stampings And Assemblies) मागील एका वर्षात गुंतवणूकदारांचे नशीब बदलले आहे. या टाटा कंपनीच्या शेअर्समध्ये (Tata Group Stock) मागील वर्षभरात 1755.6 टक्क्यांनी वाढ झालीय (Tata Sons). अर्थात वर्षभरापूर्वी ज्याने या कंपनीत गुंतवणूक केली असेल, आज त्याचे नशीब बदलले असेल. म्हणजे तो गुंतवणूकदार (Investors) अधिक मालामाल झाला असेल. (Share Market Marathi News)

 

एक वर्षापूर्वी ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग आणि असेंबलीजच्या एका शेअरची किंमत फक्त 33.25 रुपये एवढी होती. परंतु, आज याच्या एका शेअरची किंमत 617 रुपये इतकी झाली आहे. समजा जर तेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याचे 18.55 लाख रुपये झाले असते. (Tata Group Stock)

 

दरम्यान, कंपनीच्या शेअरची किंमत मागील 52 आठवड्यांमध्ये प्रति शेअर 923.85 रुपये या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती.
तर, शेअरची निचांकी पातळी प्रति शेअर 31 रुपये एवढी होती. या मल्टी-बॅगर स्टॉकचे मार्केट कॅप 978.83 कोटी रुपये एवढे आहे.
टाटाची ही कंपनी ऑटो मॉड्यूल्स, शीट मेटल तयार करते आणि पुरवठा करते.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे.
हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केटममधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते.
त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Tata Group Stock | share market tatas automotive stampings and assemblies convert investors 1 lakh to 18 55 lakh just in one year tata sons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis – Raj Thackeray | मनसे-भाजपचं होणार मनोमिलन ?; नितीन गडकरींनंतर फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट !

 

Chhagan Bhujbal On Raj Thackeray | राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले – ‘भाजपाविरोधात बोलता बोलता कोहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला’

 

Obesity And Acidity | पाण्यात ‘ही’ एक वस्तू मिसळून पिण्यास करा सुरूवात, वितळू लागेल चरबी आणि दूर होईल अ‍ॅसिडिटी