Tata Group | आता रतन टाटा यांची कंपनी बनवणार बॅटरी, जाणून घ्या काय आहे TATA ग्रुपची योजना?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Group | भारतातील टेक ते ऑटो उद्योगापर्यंतच्या व्यवसायात गुंतलेला टाटा समूह (Tata group) भारतात आणि परदेशात बॅटरी कंपनी सुरू करण्याच्या तयारीत आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी बुधवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, टाटा सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (E-Vehicles) निर्मितीवर भर देत आहे. ते म्हणाले की, टाटा समूह सर्व व्यवसायांमध्ये बदल करत आहे. यामध्ये टाटा मोटर्स आणि त्यांचे ब्रिटीश लक्झरी युनिट जग्वार लँड रोव्हर यांचा समावेश आहे.

 

जाणून घ्या काय आहे कंपनीची योजना?
भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स 2025 पर्यंत 10 इलेक्ट्रिक मॉडेल्स लॉन्च करण्याची योजना आखत आहे, तर जग्वार लँड रोव्हरचा लक्झरी जॅग्वार ब्रँड 2025 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक होईल आणि ही कार निर्माता कंपनी 2030 पर्यंत सर्व ई-मॉडेल्स लाँच करेल.

 

ते म्हणाले, हवामान बदलाचा दबाव वाढत आहे. टाटा समूह लवकरच कार्बन न्यूट्रल होण्याचे आपले ध्येय जाहीर करेल.
ते पुढे म्हणाले की, बॅटरी ब्लूप्रिंट रिन्यूएबल एनर्जी, हायड्रोजन, स्टोरेज सोल्यूशन्स आणि
सर्कुलर इकॉनॉमीमध्ये गुंतवणूक करून भविष्यासाठी सज्ज होणे हा एका मोठ्या योजनेचा भाग आहे. (Tata Group)

 

Web Title :- Tata Group | tata group readying a plan for battery company check details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock | 3 रुपयांवरून 240 वर पोहचला हा मल्टीबॅगर शेयर, वर्षभरात 1 लाखाचे झाले 75 लाख!

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | लाच लुचपत प्रतिबंधकच्या ट्रॅपमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ, 1.50 घेताना कर्मचाऱ्याला ‘रेडहँड’ पकडलं तर पीआय ‘गायब’?

 

MS Dhoni | न्यू जर्नी : महेंद्र सिंह धोनी तमिळ फिल्म करणार प्रोड्यूस, पहिल्या चित्रपटात नयनतारा असेल लीड एक्ट्रेस