Tata Group च्या ‘या’ स्टॉकमध्ये मिळू शकतो 41% शानदार रिटर्न; दमदार बिझनेस आऊटलुकवर BUY रेटिंग; पहा टार्गेट

0
155
Tata Group tata group stocks global brokerage jefferies buy call on tata consumer products on strong business outlook check target price and expected return
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Group | ‘जिओपॉलिटिकल’ टेन्शनमुळे जागतिक बाजारात सुरू असलेल्या उलथापालथीमुळे भारतीय बाजारांनाही धक्का बसत आहे. देशांतर्गत शेअर बाजारात चढ – उतार होत आहे. दरम्यान, जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओसाठी दर्जेदार स्टॉक्स शोधत असाल, तर टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (Tata Consumer Products Limited) या टाटा ग्रुप (Tata Group) कंपनीच्या शेअर्सवर डाव लावू शकता. (Tata Group)

 

ग्लोबल ब्रोकरेज रिसर्च फर्म जेफरीज (Jefferies) ने टाटा कंझ्युमर (TCPL) वर खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की बिझनेस कन्सॉलिडिशेननंतर, टीसीपीएल एक मजबूत फूड अँड बेव्हरेजेस (F&B) कंपनी म्हणून उदयास आली आहे.

 

TCPL : काय आहे ब्रोकरेजचा सल्ला
जेफरीज म्हणतात की बिझनेस कन्सॉलिडिशेननंतर, टाटा कंझ्युमर एक मजबूत फूड अँड बेव्हरेजेस कंपनीत बदलली आहे.
चहा आणि मीठ कॅटेगरीत लिडिंग ब्रँडसह भारतीय व्यवसायातून कंपनीचे उत्पन्न 70 टक्के आहे.

यासह, कंपनी हाय ग्रोथ सेंटीमेंट जसे की डाळी, ब्रेकफास्ट इत्यादीमध्ये कंपनी मजबूत आहे.
एकूणच, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये लीडर ब्रँड्सच्या मिश्र उत्पादनांचा समावेश आहे.
याशिवाय हळूहळू वाढणार्‍या आंतरराष्ट्रीय व्यवसायामुळे नफाही वाढला आहे. (Tata Group)

ब्रोकरेजचे म्हणणे आहे की कंपनीच्या युनिक पोर्टफोलिओसाठी चांगले मार्जिन दिसत आहे.
पीयर्सच्या तुलनेत कंपनी मार्जिनच्या बाबतीत चांगल्या स्थितीत आहे.
ब्रोकरेजने FY22-25E साठी EPS चा 17 टक्के CAGR अंदाज लावला आहे आणि त्याला ’बाय’ रेटिंग दिले आहे.

टाटा ग्लोबल बेव्हरेजेस (TGB, चहा आणि कॉफी) आणि टाटा केमिकल्सच्या कंझ्युमर बिझनेस (मीठ आणि कडधान्य) च्या विलीनीकरणानंतर TCPL ची स्थापना 2019 मध्ये झाली. विलीनीकरणानंतर, उत्पादनांना सुव्यवस्थित करण्यासाठी कंपनीचे फोकस आणि स्केल आणखी सुधारले आहे.

टाटा कंझ्युमर : 41% पर्यंत वाढू शकतात शेअर्स
जेफरीजने स्टॉकला ’बाय’ रेटिंग दिले आहे. तसेच, 920 रुपये प्रति शेअर (SoTP-आधारित) टार्गेट दिले आहे.
मात्र, ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की अपसाईड केसमध्ये, हा स्टॉक 1060 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
9 जून रोजी शेअरची किंमत 754 रुपये होती.

अशाप्रकारे, स्टॉकमध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 41 टक्के वाढ दिसू शकते.
ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, कंपनीला वेगाने वाढणारी इनपुट कॉस्ट, कंजम्पशन स्लोडाऊन आणि मोठ्या प्रमाणात विलीनीकरण आणि अधिग्रहण यांचा धोका आहे.
मात्र, दृष्टीकोन सकारात्मक आहे. डाउनसाईड केसमध्ये, स्टॉक 640 रुपयांपर्यंत येऊ शकतो.

 

Web Title :- Tata Group | tata group stocks global brokerage jefferies buy call on tata consumer products on strong business outlook check target price and expected return

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा