Tata Group | TATA च्या ‘या’ शेयरने दिला 25,000% रिटर्न, 35 चा शेयर आता 9,000 रुपयांच्या पुढे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Group | जर एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवणूकदाराला 100% रिटर्न मिळाला तर तो मालामाल होतो. कल्पना करा की एखाद्या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूकदाराला 25,000% पेक्षा जास्त परतावा मिळाला तर काय होईल ? हे खरे आहे. Tata Group कंपनीच्या Tata Elxsi च्या शेअरनी गुंतवणूकदारांना 25,642% रिटर्न दिला आहे.

 

व्यवहाराच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी कंपनीचा शेअर 6.78% वाढून 9,010 रुपयांवर बंद झाला. हा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. MSCI ने फर्मला बेंचमार्क इंडेक्समध्ये समाविष्ट करण्यास सांगितले असल्याच्या वृत्तानंतर टाटा एलेक्सीच्या शेअरमध्ये तेजी आली आहे.

 

1999 मध्ये प्रति शेअर किंमत 35 रुपये
Tata Alexi चा चार्ट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की 1999 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 35 रुपये होती. त्याच वेळी, 2014 मध्ये त्याची किंमत 300 रुपयांच्या पुढे पोहोचली. त्यानंतर या कंपनीने जो वेग पकडला आहे, तो अंदाजाच्या पलिकडील आहे. (Tata Group)

2018 मध्ये, शेअरची किंमत 1000 रुपयांच्या पुढे गेली. त्याच वेळी, 2020 मध्ये, त्याची किंमत पुन्हा 882 रुपयांपर्यंत खाली आली. मात्र, त्यानंतर त्यात जबरदस्त वाढ झाली. 2021 मध्ये 2500 रुपयांच्या किंमतीनंतर आता 2022 मध्ये 9000 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर यात आणखी वाढ होण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

वर्षभरात 235% रिटर्न
Tata Elxsi च्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात 235.12% चा मजबूत रिटर्न दिला आहे. 30 मार्च 2021 रोजी एनएसईवर कंपनीचा शेअर 2,688.60 रुपये प्रति शेअर होता, जो आता प्रति शेअर 9,010 रुपये झाले आहेत.

या वर्षी 2022 मध्ये आतापर्यंत, टाटा एलेक्सीचा शेअर 52.88% वर गेला आहे, तर एका महिन्यात हा शेअर 37.25% ने वाढला आहे. गेल्या पाच व्यवहाराच्या सत्रांमध्ये शेअरने 22.77% ची वाढ नोंदवली आहे.

 

Web Title :- Tata Group | tata share gave a return of 25000 35 shares now cross rs 9000

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा