Tata Group | रतन टाटा यांच्या 2 कंपन्यांनी करून दिली जबरदस्त ‘कमाई’, जाणून घ्या कसा झाला गुंतवणुकदारांचा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Tata Group | टाटा ग्रुप (Tata Group) च्या दोन कंपन्यांच्या शेयरमध्ये आज जबरदस्त तेजी दिसून आली, यामुळे गुंतवणुकदारांचा मोठा फायदा झाला आहे. यापैकी पहिली कंपनी आहे टायटन लिमिटेड (Titan Limited), जिचा शेयर 10 टक्केपेक्षा जास्तच्या तेजीसह बंद झाला आहे. तर दुसरी कंपनी टाटा मोटर्स, जिचा शेयर 12 टक्केच्या तेजीसह बंद झाला. आज ग्रुपच्या 16 लिस्टेड कंपन्यांपैकी 13 कंपन्यांमध्ये जबरदस्त तेजी पहायला मिळाली आहे.

टायटन लिमिटेडच्या गुंतवणुकदारांना धनलाभ

आज टायटनचा शेयर व्यवहाराच्या सत्रात 52 आठवड्यांच्या उंचीवर पोहचला होता.
बाजार बंद झाल्यानंतर कंपनीची शेयर प्राईस 10.69 टक्केच्या तेजी म्हणजे 229.40 रुपयांच्या तेजीसह 2376.20 रुपयांवर बंद झाला आहे.
जर एखाद्या गुंतवणुकदाराकडे टायटनचे 1000 शेयर असतील तर त्यास आज 229400 रुपयांचा फायदा झाला असेल.
जाणकारांनुसार आगामी दिवसात कंपनी आणि गुंतवणुकदारांना आणखी फायद होऊ शकतो.

टाटा मोटर्सचे (Tata Motors) गुंतवणुकदार मालामाल

दुसरीकडे टाटा मोटर्सने गुंतवणुकदारांना खुश केले आहे. कंपनीचा शेयर 12 टक्केच्या तेजीसह बंद झाला आणि व्यवहाराच्या सत्रात कंपनीचा शेयर व्रिकमी 52 आठवड्यांच्या उंचीवर पोहचला.
बीएसईकडून मिळालेल्या आकड्यांनुसार आज कंपनीचा शेयर 12 टक्के म्हणजे 40.40 रुपयांपेक्षा जास्त तेजीसह 376.40 रुपयांवर बंद झाला.
तर व्यवहाराच्या सत्रात कंपनीचा शेयर 380.55 रुपयांसह व्रिकमी उंचीवर पोहचला.

 

16 पैकी 13 कंपन्यांच्या शेयरमध्ये तेजी

टाटा मोटर्स आणि टायटनशिवाय ग्रुपच्या आणखी 11 कंपन्यांच्या शेयरमध्ये तेजी दिसून आली. तर तीन कंपन्यांमध्ये किरकोळ घसरण दिसून आली.
इंडियन हॉटेल्स आणि ट्रेंट लिमिटेडच्या शेयरमध्ये सुमारे 6 टक्केची तेजी दिसून आली. व्होल्टासचे शेयर 3 टक्केच्या तेजीसह बंद झाले. सुमारे 6 कंपन्यांमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के तेजी दिसून आली.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Tata Group | these two companies of ratan tata made big return today know how investors benefited

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्याच्या मोहम्मदवाडीत भरदिवसा झाडे उखडून टाकण्याचा प्रकार; समाजकंटकांविरुद्ध कारवाईची नागरिकांची मागणी

44 कोटी SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! उद्यापासून 3 दिवस ‘या’ वेळेत करू शकणार नाही पैशांचा व्यवहार; जाणून घ्या का?

3rd wave of covid in india | ऑनलाइन साजरा करा सण, 3 महिन्यांपर्यंत निष्काळजीपणा पडू शकतो महागात – केंद्राचा सल्ला