Tata Group TTML | टाटा ग्रुपच्या ‘या’ शेयरमध्ये पैसा लावणार्‍यांचे मोठे नुकसान, 41.50 रुपयांपर्यंत येईल टीटीएमएलचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Group TTML | 20 दिवसांपूर्वी पर्यंत, टाटा समूहाची उपकंपनी टीटीएमएल (Tata Group TTML) ही आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत होती, पण आता ती कंगाल करू लागली आहे. हा शेअर आता 290.15 रुपयांवरून 149.20 रुपयांवर घसरला आहे. 11 जानेवारीपासून त्याला लोअर सर्किट लागत आहे. या कालावधीत कोणीही या शेअरमध्ये पैसे गुंतवण्यास तयार नाही आणि खरेदीदारांअभावी लोकांचे नुकसान थांबवता येत नाही. या कालावधीत स्टॉकमध्ये जवळपास 50 टक्के घट झाली आहे.

 

11 जानेवारी रोजी टीटीएमएलचा स्टॉक (TTML Stock) 290.15 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला होता. याआधी, त्याने एका वर्षात 2830 टक्के इतका परतावा दिला होता. मात्र, 20 दिवसांपूर्वी एखाद्याने त्यात एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे एक लाख फक्त 51427 रुपये राहिले असते.

 

23 डिसेंबरपासून ते जवळजवळ दररोज त्यास अप्पर सर्किट लागत होते. 23 डिसेंबरला तो 154.10 रुपयांवर बंद झाला आणि 10 जानेवारीला 290.15 रुपयांवर पोहोचला. या कालावधीत गुंतवणूकदारांना 188 टक्के रिटर्न दिला.

 

टीटीएमएलची किंमत 41.50 रुपयांपर्यंत येईल का?
टाटा टेलिसर्व्हिसेस Tata Teleservices (Maharashtra) ने मंगळवारी सांगितले की, एजीआर थकबाकीने संबंधीत व्याज इक्विटीमध्ये रूपांतरित करेल. त्यामुळे कंपनीतील सरकारची हिस्सेदारी 9.5 टक्के इतकी होऊ शकते. टाटा टेलिसर्व्हिसेसने स्टॉक एक्स्चेंजला (Tata Teleservices Share) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या मूल्यांकनानुसार व्याजाचे निव्वळ वर्तमान मूल्य (NPV) सुमारे 850 कोटी रुपये आहे. (Tata Group TTML)

 

हा अंदाज दूरसंचार विभागाच्या दुजोर्‍यावर अवलंबून आहे. व्याजाचे इक्विटीमध्ये रूपांतर केल्यास कंपनीतील सरकारचा हिस्सा 9.5 टक्के होईल. DoT ने नोटीसमध्ये केलेल्या गणना पद्धतीनुसार, 14 ऑगस्ट 2021 च्या संबंधित तारखेनुसार कंपनीची सरासरी शेअर किंमत प्रति इक्विटी अंदाजे 41.50 रुपये आहे. तेव्हापासून वाढत असलेल्या या शेयरमध्ये विक्रीचा काळ सुरू झाला आहे.

काय करते टीटीएमएल?
टीटीएमएल ही टाट टेलिसर्व्हिसेसची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे.
कंपनी व्हॉईस, डेटा सेवा पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत.
बाजारातील जाणकारांच्या मते, गेल्या महिन्यात कंपनीने कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा सुरू केली आहे.
यास जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
कंपन्यांना जलद इंटरनेट आणि ऑप्टिमाइझ्ड नियंत्रणासह क्लाउड आधारित सुरक्षा सेवा ऑप्टोमाईझ्ड नियंत्रण मिळत आहे.

 

क्लाउड आधारित सुरक्षा हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे डेटा सुरक्षित ठेवता येतो.
डिजिटल आधारावर चालणार्‍या व्यवसायांना या लीज लाईनमुळे खूप मदत मिळेल.
यामध्ये सर्व प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून सुरक्षितता अंतर्भूत करण्यात आली असून,
त्यासोबतच वेगवान इंटरनेट सुविधाही देण्यात आली आहे.

 

Web Title :- Tata Group TTML | big loss in share of tata group will the price of ttml come up to rs 41

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Singer Rihanna Pregnant | लवकरच जगप्रसिद्ध गायिका ‘Rihanna’ होणार आई, बेबी बंपसह बॉयफ्रेंडसोबत फोटो पोस्ट करत दिली ‘Good News’

 

Pune Corona Updates | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 5271 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 3570 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी