Tata Group TTML Share | कंगाल करणार्या टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीच्या शेयरने 7 दिवसात गुंतवणुकदारांना दिला जबरदस्त रिटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Group TTML Share | मागील महिन्यात गुंतवणुकदारांना कंगाल करणारी टाटा समूहाची कंपनी (Tata group company) Tata Teleservices Ltd. चे शेअर (Share) आता जबरदस्त रिटर्न देत आहेत. TTML च्या शेअरनी केवळ 7 सत्रात प्रचंड नफा दिला आहे. 8 मार्च रोजी हा शेअर 93.40 रुपयांपर्यंत खाली आला होता आणि आज अपर सर्किटसह बीएसईवर 125.15 रुपयांवर आहे. वर्षभरापूर्वी ज्यांनी त्यात एक लाख रुपये गुंतवले असतील, त्याचे एक लाख आता 7 लाख 90 हजार रुपये झाले असतील. (Tata Group TTML Share)
TTML काय करते?
TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. कंपनी व्हॉईस, डेटा सेवा पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत. बाजारातील जाणकारांच्या मते, गेल्या महिन्यात कंपनीने कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट बेस्ड सेवा सुरू केली आहे.
यास उदंड प्रतिसाद मिळत आहे, कारण यामध्ये कंपन्यांना क्लाउड बेस्ड सुरक्षा सेवा आणि वेगवान इंटरनेटसह ऑप्टिमाइझ्ड कंट्रोल मिळत आहे. क्लाउड बेस्ड सुरक्षा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे डेटा सुरक्षित ठेवता येतो. डिजिटल आधारावर चालणार्या व्यवसायांना या लीज लाइनमुळे खूप मदत मिळेल. (Tata Group TTML Share)
मागील 6 सत्रात सलग अप्पर सर्किट
हा शेअर 290.15 रुपयांवरून 93.40 रुपयांपर्यंत घसरल्यानंतर गेल्या 6 सत्रांपासून सतत अप्पर सर्किटने ट्रेडिंग करत आहे. मागील काही काळात टीटीएमएलचे शेअर्स गुंतवणूकदारांना सतत कंगाल करत होते. तेव्हा त्यांना कुणी खरेदीदार सापडत नव्हते आणि आज कोणी विकायला तयार नाही.
बुधवारी शेअर बाजार (Stock Market) उघडताच टीटीएमएलचा शेअर 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 125.15 रुपयांवर पोहोचला. त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक रु. 10.45 आहे.
एका वर्षात 8 पट रिटर्न
जर आपण मागील 6 महिन्यांबद्दल बोललो, तर त्यातील प्रत्येक शेअरने 82.05 रुपये नफा दिला आहे म्हणजेच 220.27 टक्के रिटर्न दिला आहे. येथे, गेल्या 1 महिन्यात सततच्या अप्पर सर्किटमुळे, या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. आता केवळ 14.86 टक्के नुकसान दिसत आहे.
एक वर्षाबद्दल बोलायचे झाले तर तो आतापर्यंत 42.23 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
मात्र, वर्षभरापूर्वी ज्यांनी यात पैसे टाकले, ते आजही 690.07 टक्के नफ्यात आहे.
या शेअरची किंमत 16 मार्च 2021 रोजी 15.85 रुपये होती आणि आज 125.15 रुपये आहे.
तिसर्या तिमाहीत 302 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा
टाटा टेलिसर्व्हिसेस लि. समायोजित सकल महसूल (एजीआर) देय रकमेशी संबंधित व्याज इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याच्या
(टीटीएमएल) निर्णयामुळे स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली.
यानंतर कंपनीने आपला निर्णय रद्द केला, त्यानंतर काही दिवस स्टॉकने उसळी घेतली,
परंतु डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिसर्या तिमाहीत कंपनीला 302 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाल्याच्या वृत्तानंतर, दररोज लोअर सर्किट लागत होते.
वर्षभरापूर्वीच्या तिमाहीत 298 कोटींचा तोटा झाला होता. 11 जानेवारी रोजी टीटीएमएलचा स्टॉक 290.15 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला होता.
डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)
Web Title :- Tata Group TTML Share | tata group company ttml share gave a sloppy return of 74 percent in 7 days
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Abhay 3 Trailer | Zee5 ची अभय 3 वेब सीरिजचा ट्रेलर लॉन्च, सीरीज होणार ‘या’ तारखेला प्रदर्शित