फायद्याची गोष्ट ! 4 टक्क्यांपेक्षाही कमी व्याजानं मिळतंय कर्ज, सोबतच 8 लाख रूपयांचं ‘व्हाउचर’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सणांच्या काळात जर घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी टाटा हौसिंग एक शानदार ऑफर घेऊन आले आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला 4 टक्केपेक्षा कमी व्याजदराने होम लोन मिळू शकते. जाणून घेवूयात काय आहे ऑफर…

एक वर्षासाठी 3.99 टक्के व्याज
टाटा हौसिंगने एका योजनेची घोषणा केली आहे, ज्याअंतगात घर खरेदी करणारांना होम लोनवर एका वर्षासाठी 3.99 टक्के व्याजदर भरावा लागेल. तर, कंपनी संभाव्य ग्राहकांना आकषिंत करण्यासाठी उर्वरित रक्कम स्वता भरेल.

20 नोव्हेंबरपर्यंत संधी
टाटा हौसिंगने वक्तव्यात म्हटले आहे की, या योजनेत ग्राहकांना एक वर्षासाठी केवळ 3.99 टक्के फ्लॅट व्याजदर भरावा लागेल. अन्य रक्कम टाटा हौसिंग उचलेल. ही योजना 20 नोव्हेंबरपर्यंत 10 योजनांसाठी वैध आहे.

आठ लाख रुपयांपर्यंत गिफ्ट व्हाउचर
टाटा हौसिंगने सांगितले की, ग्राहकांना बुकिंगनंतर संपत्तीच्या आधारावर 25,000 रूपयांपासून आठ लाखांपर्यंतचे गिफ्ट व्हउचर मिळेल. व्हाउचर 10 टक्के पैसे भरल्यानंतर आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रेशननंतर जारी केले जाईल.

घर खरेदीसाठी मदत
टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चरच्या सीनियर अधिकार्‍याने सांगितले की, कोरोना व्हायरस महामारीमुळे मागील काही महिन्यांपासून रियल इस्टेट क्षेत्रात सर्वात वाईट स्थिती आहे. परंतु आता यामध्ये थोडी सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. सरकार तसेच आरबीआयने रियल इस्टेट क्षेत्राला दिलासा देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत आणि आता खासगी क्षेत्राची पाळी आहे की, त्यांनी घर खरेदी करण्यासाठी मदत करावी.

लोन घेणे खुप स्वस्त आणि सोपे
रिझर्व्ह बँकेने कोरोना काळात रेपो रेटला लागोपाठ कात्री लावली आहे. या कारणामुळे बँकांवर व्याजदर कमी करण्यासाठी दबाव आहे. यामुळे लोन घेणे खुप स्वस्त आणि सोपे झाले आहे.