Tata IPL 2022 Dhoni | महेंद्र सिंह धोनी 2022 आयपीएलनंतर होणार निवृत्त ?; स्वत: धोनीने केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Tata IPL 2022 Dhoni | आयपीएलमधील (Tata IPL 2022 Dhoni) सर्वात मजबुत संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) लौकिकेला साजेशी कामगिरी करता आली नाही. चेन्नई संघाचं नेतृत्त्व हे अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) सोपवण्यात आलं होतं. मात्र जडेजाच्या नेतृत्त्वामध्ये चेन्नईने 8 सामने खेळले आहेत मात्र यामधील दोन सामन्यांमध्येच त्यांना विजय मिळवता आला. धोनीकडे (MS Dhoni) नेतृत्त्व गेल्यावर पहिलाच सामना चेन्नईने जिंकला, मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा होत आहेत. अशातच यावर स्वत: धोनीने खुलासा केला आहे.

 

यंदाच्या हंगामातील धोनीच्या (Tata IPL 2022 Dhoni) नेतृत्त्वाखाली पहिला सामना हा सनराइजर्स हैदराबादविरोधात (Sunrisers Hyderabad) होता. या सामन्याच्या नाणेफेकीवेळी धोनीला विचारण्यात आलं की, पुढच्याही सीझनमध्ये तो पिवळ्या जर्सीमध्ये (Yellow jersey) दिसणार का यावर, मला तुम्ही पुढच्याही सीझनमध्ये पिवळ्या जर्सीमध्ये पाहाल मात्र जर्सी कोणती असेल हे कोणालाही माहिती नाही, असं म्हणत धोनीने त्याच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चांणा पुर्णविराम दिला.

आम्हाला आता या सीझनमधील आमच्या संघाच्या परिस्थितीकडे पाहणं गरजेचं आहे.
कारण क्षेत्ररक्षण (Fielding) करताना आमच्या संघाकडून झेल सोडले गेले आहेत त्यावर आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे, असंही धोनीने सांगितलं.
धोनीच्या नेतृत्त्वामध्ये चेन्नईच्या संघाने चारवेळा आयपीएलची ट्रॉफी (IPL Trophy) जिंकली आहे.
रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) धोनी हा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.

 

दरम्यान, कर्णधारपदाचा रविंद्र जडेजाने तडकाफडकी राजीनामा दिला होता.
मी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदाचा राजीनामा दिला असल्याचं जडेजाने सांगितलं.

 

Web Title :- Tata IPL 2022 Dhoni | ipl 2022 ms dhoni will you retire after this ipl captain kool dhoni made a big statement said

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा