Tata IPL 2022 | आयपीएलच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर ! आता आयपीएल रद्द होणार नाही, कारण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Tata IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या हंगामामध्येही कोरोनाचं (Corona) विघ्न आलेलं आहे. दिल्ली कॅपिटल्समधील (Delhi Capitals) संघाचे फिजिओ पॅट्रीक फरहार्ट (Patrick Farhart) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर संघातील खेळाडू मिचेल मार्श (Mitchell Marsh) याची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह (Covid Test positive) आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएल (IPL 2022) रद्द होणार अशा चर्चांणा क्रीडा वर्तुळात उधाण आलं होतं. मात्र आता एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. (Tata IPL 2022)

 

मिचेल मार्शची दुसरी कोरोना चाचणी निगेटीव्ह (Second Corona Test Negative) आल्याची माहिती समोर येत आहे. मिचेल मार्शची दुसरी चाचणी निगेटीव्ह आल्याने सर्वांनाच दिलासा मिळाल आहे. कारण परवा म्हणजेच 20 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सचा सामना पंजाब किंग्जसोबत (Punjab Kings) होणार आहे. (Tata IPL 2022)

 

मिचेल मार्श हा दिल्लीच्या संघाकडून पहिल्यांदा मैदानात उतरला होता त्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्या सामन्यात मार्शने अवघ्या 14 धावा केल्या होत्या. त्यानंतर चार दिवसांनी त्याला कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. मार्श सामना खेळल्यानंतर पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता त्याची दुसरी चाचणी निगेटीव्ह आल्याने कोणत्याही सामन्यामध्ये फेरबदल होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

दरम्यान, दिल्ली संघाचे फिजिओ पॅट्रीक फरहार्ट यांना कोरानाची लागण झाली होती.
त्यानंतर मार्श हा अनेकवेळा त्यांच्या संपर्कात आल्याने मार्शही पॉझिटिव्ह आल्याचं समजत आहे.

 

Web Title :-  Tata IPL 2022 | mitchell marsh tests negative dc vs pbks match to go ahead as scheduled in ipl

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा