मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुन्हा एकदा कोरोना (Corona) आपले हातपाय पसरायला लागला असल्याचं दिसत आहे.
दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची (Corona patient) संख्या वाढताना दिसत आहे.
याचा आयपीएललाही (Tata IPL 2022) मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे आयपीएलमधील (Tata IPL 2022) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाच्या मागे कोरोनाची पीडा लागलेली दिसत आहे.
दिल्ली संघातील आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे.
सामना सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना दिल्ली कॅपिटल्स संघातील आणखी एका परदेशी खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.
न्युझीलंडचा (New Zealand) खेळाडू टीम सायफर्ट (Tim Seifert) कोरोनाबाधित झाल्याची माहिती समजत आहे.
दिल्लीच्या खेळाडूंमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
आयपीएल 2022 (Tata IPL 2022) चा 32 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (DCvsPK) यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) होणार आहे.
या सामन्याआधी खेळाडूंची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली त्यानंतर दिल्लीच्या खेळाडूंना सामना खेळता येणार,
असा निर्णय बीसीसीआयने (BCCI) घेतला.
दरम्यान, आयपीएल आता कुठे रंगात यायला लागली आहे तर कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.
मात्र आता दिल्ली संघातील खेळाडू जागरूक झाले असून सामना चालू झाल्यावर पॅव्हेलिअयनमध्ये मास्क (Mask) लावून बसलेले दिसले.
Web Title :- Tata IPL 2022 | one more foreign player of delhi capitals found corona positive amid dc vs pbks ipl 2022 match
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update