Tata IPL Final -2022 | आयपीएलच्या फायनल मॅचची वेळ बदलली; किती वाजता सुरु होणार मॅच?; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Tata IPL Final -2022 | यंदाच्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीग Indian Premier League (IPL) म्हणजेच IPL फायनल मॅच (Tata IPL Final -2022) 29 मे रोजी अहमदाबादमध्ये (Ahmedabad) होणार आहे. दरम्यान, आता आयपीएलच्या फायनलची वेळ बदलण्यात आली आहे. ही मॅच इतर सामन्यांसारखी रात्री 7.30 वाजता सुरु होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. हा सामना मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे.

आयपीएलच्या फायनल (Tata IPL Final -2022) सामन्याआधी आता पारंपरिक सांगता सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यामध्ये बॉलीवूडचे कलाकार सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. हा सोहळा संध्याकाळी 6.30 मिनिटांनी सुरु होणार आहे. हा सोहळा जवळपास 50 मिनिटे चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे आयपीएलचा अंतिम सामना 7.30 ऐवजी आता रात्री 8.00 वाजता सुरु होणार असल्याची माहिती आहे. (IPL Final -2022)

 

यंदाच्या आयपीएलमध्ये उद्घाटन सोहळा देखील करण्यात आला नाही. कारण आयपीएची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा वातावरण कोरोनाची स्थिती होती. त्यावेळी केवळ 25 टक्के क्षमतेएवढीच एंट्री चाहत्यांना स्टेडियममध्ये देण्यात आली होती. तसेच, वातावरण बदलले आणि बऱ्याच सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे स्टेडियममधील आसन क्षमता ही 50 टक्के इतकी करण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएलच्या अंतिम फेरीसाठी 100 टक्के आसन क्षमता ठरवण्यात आली आहे.

Web Title : Tata IPL Final 2022 | timing change of ipl 2022 final know at what time match will be played

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त