TATA Memorial Center Recruitment 2020: टीएमसीमध्ये 104 नर्स आणि टेक्निशियनची भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टाटा मेमोरियल सेंटर मुंबईने भारतीय नागरिकांकडून सिनियर रेजिडन्ट, स्टाफ नर्स आणि तंत्रज्ञ यासह अनेक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. टीएमसीची अधिकृत वेबसाइट tmc.gov.in वर करियर सेक्शनमध्ये भरतीसाठी २ जुलै २०२० रोजी नोटीस प्रकाशित केली गेली. इच्छुक उमेदवार टीएमसीच्या वेबसाइटवर जाऊन २० जुलै २०२० पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

रिक्त पदांची एकूण संख्या – १०४
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख – २ जुलै २०२०
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – २० जुलै २०२०

वयोमर्यादा –
२७ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. नियमांनुसार आरक्षित प्रवर्गासाठी सूट देण्याची तरतूद आहे. वयात सवलती संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत भरती अधिसूचना तपासू शकता.

इथे करा अर्ज –
https://tmc.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन अप्लाय ऑनलाईन टॅबवर जा आणि अर्ज करा.

मुलाखतीच्या आधारे निवड होईल –
पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. म्हणजेच अर्जदारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची आवश्यकता नाही.

अर्ज फी –
सामान्य आणि ओबीसीसाठी ३०० रुपये आणि इतर राखीव प्रवर्गासाठी अर्ज फी द्यावी लागणार नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like