TATA च्या नव्या Safari चा फर्स्ट लूक आला समोर, जाणून घ्या काय आहेत ‘फीचर्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टाटा मोटर्स (Tata Motors) ने गुरुवारी आपल्या नव्या सफारीचा पहिला लूक जारी केला. कंपनीच्या पुणे स्थित कारखान्यामध्ये आज फ्लॅगऑफ समारंभानंतर पहिल्या नवीन सफारी (Safari) ला शोरूममध्ये पोहोचवण्यासाठी बाहेर काढण्यात आले. नवीन सफारी जानेवारीच्या अखेरीस कंपनीच्या शोरूममध्ये येईल. कंपनी लवकरच बुकिंग सुरू करणार आहे.

नवीन सफारी टाटा मोटर्सची अवार्ड विजेत्या इम्पॅक्ट 2.0 डिझाईन लँग्वेज आणि ओमेगा आर्किटेक्चर (ओमेगार्क) वर विकसित केली गेली आहे. ओमेगार्क लँड रोव्हरच्या डी8 प्लॅटफॉर्मवरून प्राप्त केलेला एक आर्किटेक्चर आहे जो ग्राहकांना नवीन सफारीमध्ये 4×4 म्हणजेच ऑल-व्हील ड्राइव्हचा पर्याय देतो.

टाटा मोटर्सच्या नवीन सफारीची इंटिरियर थीम ऑयस्टर व्हाईट (Oyster White) रंगाची आहे. कंपनी त्यामध्ये अ‍ॅश वुड (Ash Wood) डॅशबोर्ड ऑफर करीत आहे. यासह कंपनीने आपल्या व्हील आणि फ्रंटवर क्रोम फिनिश लूक दिला आहे. टाटा मोटर्सने सांगितले की भविष्यात नवीन सफारीचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील येऊ शकते. यास अशाच प्रकारे डिझाइन करण्यात आलेले आहे. देशात एसयूव्ही कल्चरला प्रोत्साहन देणार्‍या सफारीच्या नवीन अवतारात लक्झरीची सर्वत्र काळजी घेतली गेली आहे.

टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी गुएन्टर बटशेक यांनी टाटा सफारीचे वर्णन एक आयकॉनिक ब्रँड म्हणून केले. ते म्हणाले की भारतीय ग्राहकांना लक्षात ठेवून हे विकसित केले गेले आहे. यामुळे सफारीचा वारसा पुढे चालू राहील. कंपनीच्या पॅसेंजर व्हीकलचे अध्यक्ष शैलेश चंद्र म्हणाले की, सफारीचा चाहता वर्ग मोठा आहे आणि ही दोन दशकांहून अधिक काळ भारतीय रस्त्यांवर सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही राहिली आहे.