काय सांगता ! होय, टाटाची ‘ही’ कार देते 213 Km ‘मायलेज’, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशातील मोठी कार उत्पादक कंपनी टाटाने नवीन कार बाजारात आणली आहे. कंपनीने नवीन सेडान कार Tigor EV लाँच केली आहे. या गाडीमध्ये कंपनीने काही बदल करून पुन्हा बाजारात आणली आहे. जाणून घेऊयात या गाडीबद्दल

1) कंपनीने या गाडीची रेंज वाढवली असून एकदा चार्ज केल्यानंतर हि गाडी 213 किलोमीटर धावू शकणार आहे. आधी गाडी 142 किलोमीटर धावत असे. यामध्ये तीन व्हेरिएन्ट आणले असून XE+, XM+ और XT+ या तीन प्रकारात गाडी बाजारात आणली आहे.

2) नवीन गाडीची किंमत 9.44 लाख, एक्स-शोरूम दिल्ली असून देशातील 30 शहरांमध्ये हि किंमत असणार आहे. हि गाडी कमी खर्चात तयार करण्यात आली असून यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

3) या गाडीला तीन वर्षांची वारंटी मिळणारे असून 1.25 लाख किलोमीटर पर्यंत हि वारंटी असणार आहे. या गाडीत 72V,तीन फेज असणारी एसी इंडक्शन मोटर बसवण्यात आली असून याद्वारे 40 बीएचपी आणि 105 एनएमची पॉवर निर्माण करणार आहे. त्याचबरोबर यामध्ये सिंगल स्पीड ऑटोमैटिक ट्रांसमिशन देखील मिळणार आहे. 12 सेकंदात हि गाडी 0 ते 60 किलोमीटरपर्यंतचा स्पीड पकडू शकणार आहे. त्याचबरोबर हीच टॉप स्पीड हा 80 किलोमीटर प्रतितास इतका असणार आहे. कारचे एकूण वजन हे 1516 किलो असणार आहे. त्याचबरोबर 90 मिनिटांत गाडी जवळपास 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकणार आहे.

visit : policenama.com