टाटा मोटर्स, ओलेक्टा कंपन्यांना ‘पीएमपी’ ठोठावणार ‘दंड’

olacta : पोलीसनामा ऑनलाइन – एका बाजूला शहरात प्रवाशांना पुरेशा बस नसल्याने त्याचे हाल होत असताना मागणी नोंदवूनही कंपन्यांनी वेळेवर बस पुरविल्या नाहीत, त्यामुळे पीएमपीला प्रवासी असूनही त्यांना सेवा देण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे पीएमपीला बस वेळेवर न पुरविणाऱ्या टाटा मोटर्स आणि ओलेक्ट्रा यांना प्रतिदिवशी, प्रतिबस दहा हजार रुपये दंडाची नोटीस द्यावी, अशी सूचना पीएमपीच्या बैठकीत करण्यात आली. बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी ४८ तासांत करावी, अशाही सूचना संचालक मंडळाने दिल्या आहेत. ओलेक्ट्रा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस बोलवूनही उपस्थित न राहिल्याने संचालकांनी नाराजी व्यक्त केली.

महापालिकेत पुणे महानगर परिवहन मंडळाची बैठक झाली. या वेळी महापौर राहुल जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे, आयुक्त श्रावण हर्डीकर, कॅप्टन राजेंद्र सणेर पाटील, परिवहन अधिकारी अजित शिंदे आदी उपस्थित होते. नव नियुक्त आर.टी.ओ. अजित शिंदे यांची परिवहन महामंडळाने संचालकपदी नियुक्तीस मान्यता दिली.

परिवहन महामंडळामार्फत ओलेक्ट्रा कंपनीमार्फत खरेदी करावयाच्या १२५ ई-बसेस व टाटा कंपनी यांच्याकडून ४०० सीएनजी बस खरेदी कार्यवाहीची माहिती देण्यात आली. या वेळी बस उशिरा का उपलब्ध होत आहेत, याची माहिती घेण्यात आली. त्यावर संबंधित कंपन्यांनी वेळेत बसपुरवठा केला नसल्याचे आढळून आले. त्यावरून संचालकांनी संबंधित कंपन्यांना दंड केला आहे का? अशी विचारणा केली. त्यावर नोटीस दिली आहे, असे सांगितले.

त्यावर नुसती नोटीस देऊन चालणार नाही तर दंड करायला हवा, अशी मागणी करण्यात आली. विलास मडिगेरी यांनी बसपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना प्रतिदिवशी प्रति बस दहा हजार रुपये दंड करावा, व नोटिसा तातडीने द्याव्यात, अशी सूचना केली. तसेच कंपन्यांना नोटीस देऊन खुलासा मागवून पुढील बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.

जाणून घ्या कढीपत्त्याचे फायदे !

केळी खाण्याचे १० फायदे, जाणून घ्या

मक्याचा उपमा खाण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

‘हे’ उपाय करा अन् मेकअप न करता दिसा एकदम सुंदर, जाणून घ्या

मुलांना नैसर्गिकरित्या गोरे करतात ‘हे’ ५ घरगुती उपाय; जाणून घ्या

हिंगात अनेक औषधी गुणधर्म, ‘हे’ २० रामबाण उपाय, जाणून घ्या