Tata Motors च्या शेयरमध्ये 5 दिवसात 42% ची तेजी, आजच 20% वाढला; जाणून घ्या गुंतवणुकीची रणनिती

मुंबई : टाटा मोटर्सच्या (Tata Motors) शेयरमध्ये सध्या जोरदार तेजी आहे. आज बुधवारी टाटा मोटर्सच्या शेयर्समध्ये 20 टक्के उसळी दिसत आहे. मागील 5 व्यवहाराच्या सत्रात टाटा मोटर्सच्या (Tata Motors) शेयरमध्ये जवळपास 42 टक्के उसळी दिसून आली.

या वृत्तामुळे सुद्धा स्टॉकमध्ये तेजी

शेयरमध्ये जोरदार तेजी असताना एक प्रायव्हेट इक्विटी फर्म TPG Group कंपनीच्या मालकीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल सब्सिडियरीमध्ये 7,500 कोटी रुपयांची गंतवणूक करणार आहे. या वृत्तामुळे सुद्धा या स्टॉकमध्ये तेजी आली आहे.

52 आठवड्याच्या उच्च स्तरावर

Tata Motors च्या शेयरने आज सकाळी 10.08 च्या जवळपास 63.85 रुपये म्हणजे 15.17 टक्केच्या तेजीसह 499.95 रुपयांचा आपला 52 आठवड्यांचा सर्वोच्च स्तर गाठला.

PM Gati Shakti | ‘गतीशक्ती’ योजनेतून कसे होईल शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट, जाणून घ्या सर्वकाही

टाटाने केली ही घोषणा

टाटा मोटर्सने मंगळवारी प्रायव्हेट इक्विटी फर्म TPG च्या आपल्या नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल सब्सिडियरीमध्ये 7,500 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करण्याची घोषणा केली. ही इन्व्हेस्टमेंट 18 महिन्यांच्या कालावधी दरम्यान वेगवेगळ्या हप्त्यात केली जाईल. टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटसाठी नवीन यूनिट TML EVCo बनवली आहे.

TPG ला 11-15 टक्के भागीदारी मिळेल

कंपनीने सांगितले की, इन्व्हेस्टमेंटचा पहिला राऊंड पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल. TPG ला युनिटमध्ये जवळपास 9.1 अरब डॉलरच्या व्हॅल्यूएशनवर 11-15 टक्के भागीदारी मिळेल.

ब्रोकरेज हाऊसचा सल्ला

ब्रोकरेज हाऊससुद्धा टाटा मोटर्समध्ये या गुंतवणुकीबाबत बुलिश आहे.
HSBC ने TATA MOTORS वर खरेदीची रेटिंग दिली आहे आणि शेयरचे लक्ष्य 340 रुपयांनी वाढवून 550 रुपयांपर्यंत केले आहे.
त्यांचे म्हणणे आहे की EV बिझनेसच्या 6.7-9.1 बिलियन डॉलर व्हॅल्यूवर TPG ची गुंतवणुक आली आहे.
TPG ने 1 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे.
तर स्पर्धा कमी असल्याने EV व्हॉल्यूमकडून सपोर्ट शक्य आहे.
या लक्ष्यासाठी EV व्हॅल्यूला सहभागी केले आहे.

गुंतवणुकीबाबत विश्वास वाढला

तिकडे NOMURA ने सुद्धा TATA MOTORS वर रेटिंगला न्यूट्रलवरून अपग्रेड करत खरेदीचे रेटिंग दिले आहे.
आणि त्याचे लक्ष्य 547 रुपये ठरवले आहे.
त्यांचे म्हणणे आहे की, पॅसेंजर इलेक्ट्रिक व्हेईकलमुळे अपग्रेड केले आहे.
तर भांडवल जमवल्याने ईव्ही गुंतवणुकीबाबत विश्वास वाढला आहे.
सोबतच गुंतवणूक आधारित वाढीबाबत सुद्धा कंपनीवर विश्वास वाढत आहे.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

हे देखील वाचा

Aadhaar Card | मोबाईलनंबर नसतानाही आधारकार्ड डाऊनलोड करता येऊ शकत; जाणून घ्या सोपी पद्धत

Harshvardhan Patil | ‘भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते’

Driving License | दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी जर केल्या ‘या’ 5 चूका तर रद्द होईल तुमचे ‘DL’, जाणून घ्या सर्वकाही

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Tata Motors | shares of tata motors rose 42 in 5 days climbed 20 today know the investment strategy ahead

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update