‘कोरोना’वर उपचार करणाऱ्या ‘डॉक्टरांसाठी’ TATA चा मोठा ‘निर्णय’, ‘टाटांचा’ कौतुकास्पद निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मदत करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देताना कोरोनाविरुद्धच्या लढाईत 1 हजार 500 कोटींचे दान दिल्यानंतर टाटांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या ताज ग्रुपच्या मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये आता कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरर्सना रुम्स मिळणार आहेत. अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स जर आपल्या कुटुंबीयांसोबत राहिले तर त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे वेगळं राहण्याची गरज असते. त्यामुळे समुहाने हा निर्णय घेतला आहे.

कुलाब्यातलं हॉटेल ताज महल, बंद्रा येथील ताज लँड्स, सांताक्रुजमधलं हॉटेल ताज आणि हॉटेल प्रेसिडंट या हॉटेल्समध्ये डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी या रुम्स देण्यात येणार आहेत. प्रशासन आणि सर्व डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी हा अतिशय दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे. मुंबईत आधीच जागेची कमतरता असते. त्यामुळे त्यांची सोय कुठे करायची याची चिंता प्रशासनाला होती. टाटांच्या या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत टाटांनी यापूर्वी देखील मदत केली आहे. कोरोनाच्या लढाईसाठी टाटा ट्रस्ट आणि टाटा उद्योगसमुहाच्या वतीने त्यांनी 1 हजार 500 कोटी रुपयाची मदत देण्याचे यापूर्वीच जाहीर केलं आहे. देश आणि जगासमोर संकट हे अतिशय मोठं असताना सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ती काळाच गरज आहे. मानवतेचे समोरचं हे सगळ्यात मोठं आव्हान असल्याचे टाटांनी म्हटले आहे.