Tata Play IPO | टाटा ग्रुपची आणखी एक कंपनी आयपीओ आणण्याच्या रांगेत, काय आहे कंपनीचा बिझनेस ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Tata Play IPO | गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात (Indian stock market) सुरू असलेली अस्थिरता आणि अनिश्चितता बर्‍याच अंशी कमी झाल्यानंतर आयपीओ (IPO) बाजाराने पुन्हा वेग पकडला आहे. आता दर आठवड्याला आयपीओ येत आहेत. आता टाटा ग्रुपची (Tata Group) आणखी एक कंपनी टाटा प्ले (Tata Play) आपला आयपीओ आणणार आहे. टाटा प्ले पूर्वी टाटा स्काय (Tata Sky) म्हणून ओळखले जात होती. टाटा प्ले हा प्रत्यक्षात टाटा ग्रुप आणि वॉल्ट डिस्ने इंडिया (Walt Disney India) यांचा संयुक्त उपक्रम आहे. (Tata Play IPO)

 

टाटा ग्रुपचा सॅटेलाइट टेलिव्हिजन व्यवसाय टाटा स्काय वर्षाच्या सुरुवातीला टाटा प्ले लिमिटेड (TATA PLAY LIMITED) म्हणून ब्रँडेड करण्यात आला. कंपनी या महिन्याच्या अखेरीस आयपीओसाठी सेबीकडे (SEBI) पेपर सबमिट करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा इश्यू किमान 2 हजार ते 3 हजार कोटी रुपयांपर्यंत असू शकतो. (Tata Play IPO)

 

टाटा सन्सची 41.49 टक्के भागीदारी

टाटा स्कायने 2004 मध्ये टाटा सन्स आणि नेटवर्क डिजिटल डिस्ट्रिब्युशन सर्व्हिसेस FZ-LLC (NDDS) यांच्यात 80:20 संयुक्त उपक्रम म्हणून काम सुरू केले. NDDS रूपर्ट मर्डोक यांच्या 21st Century Fox च्या मालकीचे युनिट आहे. डिस्नेने 2019 मध्ये फॉक्सचे अधिग्रहण केले. TS इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडच्या माध्यमातून डिस्नेची टाटा स्कायमध्ये आणखी 9.8% भागीदारी आहे. कंपनीत टाटा सन्सची 41.49 टक्के हिस्सा आहे.

 

कोटक महिंद्रा बँक आयपीओसाठी लीड बँकर

देशातील अग्रगण्य डायरेक्ट-टू-होम प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी टाटा प्ले आयपीओसाठी (Tata Play IPO) वेगाने काम करत आहे. कंपनीने या दिशेने पावले उचलत, कोटक महिंद्रा बँकेला (Kotak Mahindra Bank) या आयपीओसाठी लीड बँकर म्हणून आधीच नियुक्त केले आहे. त्याच वेळी, भारतातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट लॉ फर्मपैकी एक, सिरिल अमरचंद मंगलदास (सीएएम) यांची या आयपीओसाठी सल्ला देणे आणि नंतर लिस्टिंगसाठी सल्ला देण्यासाठी निवडले आहे.

 

6 कोटींहून जास्त ग्राहक

टाटा प्लेचा FY22 मध्ये महसूल 4,741 कोटी रुपये होता. टाटा प्ले 33.23% मार्केट शेअरसह सर्वात मोठी DTH सेवा प्रदाता आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (Telecom Regulatory Authority of India) आकडेवारीनुसार,
31 मार्च अखेर देशातील एकूण डीटीएच ग्राहकांची (DTH subscribers) संख्या 6.69 कोटी होती.
मात्र, कंपनीने मीडियाच्या प्रश्नांचे उत्तर दिलेले नाही.

 

Web Title : – Tata Play IPO | tata play ipo another tata group company in line to bring ipo what is the companys business

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा