Tata Power Company Stock | ‘टाटा’ची ‘पॉवर’बाज कामगिरी! 29 रुपयांचा शेअर गेला 230 रुपयांवर; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Power Company Stock | टाटा ग्रुपच्या (Tata Group) अंतर्गत आताच्या घडीला शेकडो कंपन्या कार्यरत आहे. यातील अनेक कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड (Tata Power Company Stock) आहेत. केवळ भारतीय बाजारपेठेत (Indian Market) नाही, तर शेअर बाजारातही (Stock Market) दमदार कामगिरी करताना पहायला मिळत आहे. टाटा समूहातील एका कंपनीने कमाल कामगिरी केली आहे. केवळ 2 वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना तब्बल 8 पटीने रिटर्न दिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

 

टाटा समूहातील TATA Power या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. टाटा पॉवरच्या शेअर्सनी गेल्या दोन वर्षातच जबरदस्त परतावा दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 29 रुपयांवरुन 230 रुपयांवर पोहोचले आहेत. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मागील दोन वर्षात जवळपास 8 पटीने परतावा दिल्याचे सांगितले जात आहे.

 

2 वर्षात 1 लाखाचे झाले 8 लाख
मुंबई शेअर बाजारात (Mumbai Stock Exchange) टाटा पॉवरचे शेअर्श 8 मे 2020 रोजी 28.25 रुपयांच्या पातळीवर होता.
हा शेअर 17 मार्च 2022 रोजी 232.10 रुपयांच्या पातळीवर आहे.
एखाद्या व्यक्तीने 8 मे 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती,
तर आताच्या घडीला हे पैसे 8.14 लाख रुपये झाले असते. म्हणजे गुंतवणूकदारांना 2 वर्षात 7 लाख रुपयांचा फायदा झाला असता.

जर एखाद्या 4 ऑक्टोबर 2002 रोजी कंपनीमध्ये 1 लाख गुंतवले असते आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती,
तर आता हे पैसे 25.4 लाख रुपयांच्या जवळपास गेले असते. म्हणजे गुंतवणुकीवर 24 लाख रुपयांचा थेट फायदा झाला असता.
विशेष म्हणजे टाटा पॉवरचे मार्केट सुमारे 73 हजार 580 कोटी रुपये आहे.

 

Web Title :- Tata Power Company Stock | tata group tata power company stock give 2 thousand percent plus return investors get 25 lakh on 1 lakh investment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दणका, DA वाढीबाबत दिलं स्पष्टीकरण

 

Pune Corona Update | पुणेकरांची ‘कोरोना’वर मात ! 12 दिवसांत एकही मृत्यू नाही

 

The Kashmir Files | ‘द काश्मीर फाइल्स चित्रपट म्हणजे दहशतवाद्यांचा मोठा कट’, भाजपच्या मित्रपक्षाचा खळबळजनक दावा