Tata Power चा शेयर 7% घसरणीसह दोन महिन्यांच्या खालच्या स्तरावर, जाणून घ्या ब्रोकरेज फर्मचा सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टाटा पॉवरचे (Tata Power) शेयर सोमवारी 7 टक्केच्या घसरणीसह दोन महिन्यांच्या खालच्या स्तरावर पोहोचले. स्थानिक शेयर बाजारात घसरणीमुळे टाटा ग्रुपच्या (Tata Group) कंपनीच्या शेयरवर दबाव दिसून येत आहे. (Tata Power)

 

टाटा पॉवरच्या शेयरने 223 रूपयांचा आपला मागील खालचा स्तर 8 मार्च 2022 ला गाठला होता.
6 एप्रिलनंतर टाटा पॉवरच्या शेयरमध्ये 20 टक्के घसरण झाली आहे.
तर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये जवळपास 9 टक्के कमजोरी दिसून येत आहे. (Tata Power)

 

टाटा पॉवरला मार्च तिमाहीत 653 कोटींचा प्रॉफिट

टाटा पॉवरचा मार्च 2022 ला संपलेल्या तिमाही दरम्यान 4 टक्के वाढीसह 653 कोटी रूपये अ‍ॅडजेस्टेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स नोंदला गेला, जो वार्षिक आधारावर 66.3 टक्के जास्त होता.
चांगल्या पीएटीचे मुख्य कारण कोस्टल गुजरात पॉवर लि. च्या स्टँड अलोन बिझनेसमध्ये मर्जरमुळे जास्त डिव्हिडेंट इन्कम आणि टॅक्स बेनिफिटचा फायदा मिळाला आहे.
सोबत रिन्युएबल एनर्जी बिझनेसची चांगली कामगिरीसुद्धा होत आहे.

 

कोल मायनिंगने दिला झटका

शेयरखानने इन्व्हेस्टर्सला पाठवलेल्या एका नोटमध्ये म्हटले आहे की, टाटा पॉवरचा जोर बिझनेस रिस्ट्रक्चरिंग आणि आरई बिझनेसच्या जास्त वाढीवर आहे.
पॉवर ट्रान्समिशनमध्ये नाव टिकाऊ अर्निंग ग्रोथ आणि अर्निंग क्वालिटीच्या दृष्टीने महत्वाचे राहील.
याशिवाय फ्लूएल कॉस्ट पूर्णपणे राज्यांवर टाकण्याबाबतच्या संभाव्य करारामुळे अर्निंग ग्रोथ आऊटलूकमध्ये सुधारणा होईल आणि बॅलन्सशीटला मजबूती मिळेल.

 

इलारा कॅपिटलने इन्व्हेस्टर्सला पाठवलेल्या नोटमध्ये म्हटले, आम्ही आमच्या एसओटीपी व्हॅल्यूएशनच्या आधारावर आर्थिक वर्ष 24 साठी टाटा पॉवर आरई असेट्सचे मूल्यांकन 144 रुपये प्रति शेयरवर करत आहोत,
तर गैर आरई बिझनेसची व्हॅल्यू 114 रूपये प्रति शेयर ठरवत आहोत.
आम्ही 22 एप्रिलनंतर शेयरमध्ये 18 टक्के घसरण पाहता त्याचे रेटिंग वाढवून अ‍ॅक्यूमलेट करत आहोत आणि 258 रूपये प्रति शेयरचे टार्गेट कायम ठेवले आहे.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Tata Power | tata power fell as much as 7 percent to hit a two month low know brokerage firms view

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा